CWG 2022: इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी (3 ऑगस्ट) भारतानं 5 पदकांची कमाई केलीय. यामध्ये चार कांस्य आणि एका रौप्यपदकाचा समावेश आहे. यासह भारताच्या एकूण पदकांची संख्या अठरावर पोहोचली आहे. ज्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे. एवढेच नाही तर भारताने तीन पदकेही निश्चित केली आहेत, म्हणजेच येत्या काही दिवसांत भारताच्या पदसंख्येत आणखी वाढणार होणार आहे.
भारताच्या कोणकोणत्या खेळाडूनं पदक जिंकलं?
कॉमनवेल्थ स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंहनं सर्वात प्रथम 109 किलोग्राम वजनी गटात कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर सौरव घोषालनं स्क्वॉशमध्ये कांस्य तर, तुलिका माननं ज्युदोमध्ये रौप्यपदक जिंकलं. त्यानंतर गुरदीपसिंहनं रात्री उशीरा कांस्यपदकावर कब्जा केला. शेवटी भारताच्या तेजस्वीन शंकरने उंच उडीत कांस्यपदक पटकावलं. अशा प्रकारानं भारतानं सहाव्या दिवशी एकूण पाच पदक जिंकली आहेत.
कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकलेले भारतीय खेळाडू
सुवर्णपदक- 5 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)
रौप्यपदक- 6 (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान)
कांस्यपदक- 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह, तेजस्वीन शंकर)
हे देखील वाचा-
- CWG 2022 Day 6 Schedule: भारतीय बॉक्सरसह सौरव घोषाल पदक जिंकण्यासाठी सज्ज, पाहा आजचं संपूर्ण वेळापत्रक
- CM Eknath Shinde : योग्य संधी मिळाल्यास स्थानिक मैदानावरुनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील : मुख्यमंत्री
- CWG 2022, Medal Tally : पाचव्या दिवशी भारताच्या खिशात चार पदकं, दोन सुवर्ण पदकांसह दोन रौप्य पदकांवर कोरलं नाव