Indian Naval Shipyard : भारतासाठी मोठा ऐतिहासिक क्षण आहे. इतिहास पहिल्यांदा भारत परदेशी नौदलाच्या जहाजाची डागडुजीसाठी करणार आहे. भारत अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजाची डागडुजी करणार आहे. अमेरिकेन नौदलाचं जहाज डागडुजीसाठी चेन्नईमध्ये दाखल झालं आहे. अमेरिकेने चेन्नईतील एल अँड टी कंपनीसोबत (L&T) करार केला आहे. यानंतर आता अमेरिकेच्या नौदलाचं 'यूएसएनए चार्ल्स ड्रियू' जहाज चेन्नईमधील कटुपल्ली येथील एल अँड टी कंपनीच्या शिपयार्डमध्ये दाखल झालं आहे. हे जहाज 11 दिवसांसाठी भारतात दुरुस्तीसाठी असेल भारतीय संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.


संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदाच अमेरिकन नौदलाचं जहाज दुरुस्तीसाठी भारतात दाखल झालं आहे. 'यूएसएनए चार्ल्स ड्रियू' जहाज चेन्नईमधील एल अँड टी कंपनीच्या शिपयार्डमध्ये दाखल झालं तेव्हा संरक्षण सचिव अजय कुमार, भारतीय नौदलाचे सहप्रमुख व्हाईस अॅडमिरल एस.एन. घोरपडे आणि भारतातील अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी तसेच L&T कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


पहिल्यांदाच अमेरिकन नौदलाचं जहाज दुरुस्तीसाठी भारतात


इतिहासात पहिल्यांदाच भारतात परदेशी नौदलाची युद्धनौका दुरुस्तीसाठी दाखल झाली आहे. यामुळे जागतिक जहाजबांधणी क्षेत्रात भारताचं वर्चस्व दाखवण्यात मदत होणार आहे. यामुळे जहाज बांधणी आणि दुरुस्ती क्षेत्रात भारताची ताकद तसेच क्षमता दिसणार आहे. भारतीय शिपयार्डमध्ये उत्तम आधुनिक उपकरणांसह कमी खर्चात जहाजांची दुरुस्ती केली जाते.




भारतात किती नौदल शिपयार्ड आहेत?


भारतात सध्या सहा खाजगी आणि सरकारी शिपयार्ड आहेत ज्यांची एकूण उलाढाल दोन अब्ज डॉलर्स आहे. या शिपयार्डमध्ये अत्याधुनिक जहाजं तयार केली जातात. गोवा शिपयार्डने नुकतंच देशातील पहिलं स्वदेशी विमान बनवलं असून ते भारतीय नौदलाकडे सुपूर्द केलं आहे. सध्या भारतीय नौदलाच्या 41 पैकी 39 युद्धनौका स्वदेशी शिपयार्डमध्ये तयारस केल्या जात आहेत. माझगाव डॉकयार्ड येथे फ्रान्सच्या मदतीनं सहा पाणबुड्यांची निर्मिती सुरू आहे.


'मेक इन इंडिया'मुळे भारतीय उद्योगाला चालना


भारतीय उद्योगाला 'मेक इन इंडिया'मुळे देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर चालना मिळाली आहे. भारत परदेशात अनेक स्वदेशी युद्धसामग्रीचीही निर्यात करत आहे. गेल्या पाच-सहा वर्षात भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीमध्ये 800 टक्क्यांनी फायदा झाला आहे. 2014-15 मध्ये निर्यात 1500 कोटी होती, ती 2020-21 मध्ये 13,000 कोटीवर पोहोचली आहे.