IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अरूण जेटली स्टेडियमवर पहिल्या टी-20 सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारताला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचं लक्ष्य ठेवलं. परंतु, भारतानं निराशाजनक गोलंदाजी केली. ज्यामुळं भारताच्या पदरात निराशा पडली. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारे गोलंदाजी टी-20 मध्ये फ्लॉफ ठरले. 


भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खूप धावा खर्च केल्या. भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं चार षटकात 43 धावा दिल्या आणि फक्त एक विकेट मिळवली. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 18 व्या षटकात भुवनेश्वर एकूण 22 धावा दिल्या. हर्षल पटेललाही काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंही चार षटकात 43 धावा दिल्या. दुसरीकडं भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेलची कामगिरी निराशाजनक ठरली. चहलनं 2.1 षटकात 26 आणि अक्षर पटेलनं 40 धावा दिल्या. 


आयपीएलमधील कामगिरी
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा भाग असलेल्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन केलं. युजवेंद्र चहलनं आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅप काबीज केली. तर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अक्षर पटेलनंही चांगली कामगिरी केली. परंतु, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात सर्वांचाच फॉर्म हरपल्याचं दिसलं. 


भारताचा सात विकेट्सनं पराभव
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना दिल्ली येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं 20 षटकात दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तुफानी फलंदाजी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 19.1 षटकातचं लक्ष्य गाठलं. रासी व्हॅन डर डसेन (46 चेंडूत 75 धावा) आणि डेव्हिड मिलर (31 चेंडूत 64 धाव) दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.


हे देखील वाचा-