नागपूरः आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर जिल्ह्यातील 11 नगर परिषदेच्या निवडणुकाही लवकरच होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वार्डाची निर्मिती संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. सूत्रांनुसार ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनंतर पक्षाचे कार्यकर्तेही सक्रिय झाले आहे.


नागपूर जिल्ह्यात 11 नगर परिषदांपैकी काहींचा कार्यकाळ संपला आहे तर काहींचा लवकरच संपणार आहे. रामटेक, कळमेश्वर ब्राह्मणी, सावनेर, खापा, मोहपा, उमरेड, कामठी, वाडी, काटोल, मोवाड आणि नरखेडमध्ये निवडणुका लवकरच होण्याची चिन्हे आहेत.


या 11 नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रभाग प्रक्रिया राबविण्याला निवडणुक आयोगाने मंजुरी दिली आहे. सोबतच प्रभागनिहाय निवडणुकीसह आरक्षणची तारखेचीही घोषणा केली आहे. या निवडणुकीवर मोठ्या नेत्यांसह स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचेही लक्ष लागून आहे. 


जिल्हास्तरीय नेत्यांसाठी महत्वपूर्ण


11 नगरपरिषदा जिल्हास्तरीय नेत्यांसाठीही महत्वपूर्ण आहे. कोरोनामुळे काही निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. काही नगरपरिषदेचा कार्यकाळ एप्रिलमध्येच संपला होता. तर उर्वरित नगरपरिषदेचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार आहे. 13 जूनरोजी नगरपरिषद प्रमुख आरक्षणाची घोषणा करणार आहे. या अंतर्गत 15 ते 21 जून दरम्यान आक्षेप आणि सूचना मागविण्यात येणार आहे. आरक्षणाचा ड्रॉ आणि रिपोर्ट 24 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात येईल. विभागीय आयुक्त 29 जून रोजी आरक्षणाला मंजुरी देतील. 1 जुलै रोजी आरक्षणाच्या अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.


कार्यकर्ते लागले कामाला


नगरसेवक पदासाठी इच्छुकांमध्ये तयारी सुरु झाली आहे. पूर्वी कोरोनामुळे निवडणुकाल लाबणीवर गेल्या असल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली होती. मात्र आता अधिसूचनेची घोषणा झाल्याने पुन्हा नगरपरिषदेत नेत्यांची सक्रियता दिसू लागली आहे.


महानगरपालिकेच्या तारखा लवकरच
राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झालं आहे. मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिकेसह 14 महापालिकांच्या निवडणुका जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. नऊ महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून राज्य निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच संभाव्य तारखांबाबत संकेत दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकांसाठी 31 मेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार असल्याचं निश्चित केलं आहे. याचाच अर्थ या तारखेला किंवा त्यापूर्वी नोंदणी केलेल्या मतदारांना या मतदानात मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Election : नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या आरक्षणाची सोडत 13 जूनला, राज्य निवडणूक आयोगाची घोषणा


दिलासादायक! अखेर नैऋत्य मान्सून कोकणात दाखल, हवामान विभागाची माहिती