Wrestling in Commonwealth 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताच्या कुस्तीपटूंनी सुवर्णपदकांची हॅट्रीक केली आहे. नुकताच 86 किलोग्राम गटात भारताच्या दीपक पुनियानं (Deepak Punia) पाकिस्तानच्या मुहम्मद इनामला नमवत सुवर्णपदक मिळवलं आहे. दीपकने मुहम्मद याला 3-0 च्या फरकाने मात देत पदक मिळवलं असून विशेष म्हणजे दीपक पुनियाचं हे पहिलं वहिलं कॉमनवेल्थमधील पदक आहे.






स्पर्धेत सुरुवातीपासून दीपक चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. सर्वात आधी पुनियाने न्यूझीलंडच्या मॅथ्यूला 10-0 ने मात दिली. ज्यामुळे तो राऊंड 16 मधून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. त्यानंतर दीपकने आधी 6-0 च्या फरकाने उपांत्यपूर्व फेरी जिंकली. त्यानंतर सेमीफायनलमध्ये कॅनडाच्या अॅलेक्झांडर मूरेला  3-1 च्या फरकाने मात देत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली. आता फायनलमध्ये पाकिस्तानच्या मुहम्मह इनामला 3-0 ने मात देत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.


भारताचं कुस्तीतील चौथं पदक 


आज भारताचे कुस्तीपटू कॉमनवेल्थमध्ये अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहे. अंशूने रौैप्य तर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने सुवर्णपदक मिळवल्यानंतर आता कुस्तीपटू दीपक पुनियानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. दीपकच्या सुवर्णपदकामुळे भारताची पदकसंख्या 24 वर गेली आहे.








हे देखील वाचा-