Wrestling in Commonwealth 2022 : आज कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचे कुस्तीपटू अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहे. अंशूने रौैप्य तर बजरंगने गोल्ड मिळवल्यानंतर आता कुस्तीपटू साक्षी मलिकने फ्री स्टाईल 62 किलोग्राम गटात सुवर्णपदक मिळवलं आहे. तिने कॅनडाच्या अॅना गोंझालेजला (Ana Godinez Gonzalez) मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. काही वेळापूर्वीच बजरंग पुनिया (Bajrang punia) याने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्याच मॅकनील याला मात देत सुवर्णपदक मिळवलं. साक्षीच्या सुवर्णपदकामुळे भारताची पदकसंख्या 23 वर गेली आहे.


साक्षी भारताची एक अनुभवी कुस्तीपटू असल्याने ती कॉमनवेल्थमध्ये सुरुवातीपासून दमदार फॉर्ममध्ये होती. फ्री स्टाईल 62 किलोग्राम गटात तिने राऊंड 16 पासून उत्तम खेळ दाखवत एक-एक फेरी गाठली.  सेमीफायनलमध्ये साक्षीने इंग्लंडच्या खेळाडूला मात देत फायनल गाठली आणि भारतासाठी एक पदक निश्चित केलं. पण हे पदक सुवर्णच असावं यासाठी सारे प्रयत्न केले आणि ते यशस्वी करुन दाखवत अखेर फायनलमध्ये कॅनडाच्या अॅना गोंझालेजला मात देत सुवर्णपदक मिळवलं. विशेष म्हणजे फायनलचा सामना अत्यंत अटीतटीचा झाला होता. एका क्षणी 4-0 च्या आघाडीवर अॅना होती पण साक्षीने जोरदार कमबॅक करत स्कोर 4-4 असा बरोबरीत आणला आणि अखेर विजय मिळवला.   









हे देखील वाचा-