Wrestling in Commonwealth 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मधील (Commonwealth Games 2022) भारतातं पहिलं कुस्ती खेळातील पदक महिला कुस्तीपटू अंशू मलिकने  (Anshu Malik) मिळवून दिलं आहे. 57 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात तिला नायजेरियाच्या Adekuoroye हिने मात दिल्यामुळे अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंशूसह पुरुषांमध्ये बजरंग पुनिया, दीपक पुनियातर महिलांमध्ये साक्षी मलिकने फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. यामुळे भारताची आणकी तीन पदकंही निश्चित झाली आहेत. विशेष म्हणजे आज अंशूचा वाढदिवस असून तिने भारत देशाला भेटवस्तू दिली आहे.






अंशूने स्पर्धेत सुरुवातीपासून दमदार कामगिरी सुरु ठेवली होती. सेमीफायनलमध्ये देखील तिने एक दमदार असा विजय मिळवत फायनल गाठली. फायनलमध्येही अगदी कडवी झुंज अंशूने दिली. पण अखेर 6-4 अशा काहीशा फरकाने नायजेरीयाच्या Adekuoroye हिने बाजी मारली. अंशूने अखेरपर्यंत झुंज दिली अगदी शेवटच्या 10 सेकंदात अंशूने दोन गुण मारले पण अखेर नायजेरीयाच्या खेळाडूने 6-4 ने विजय मिळवला. ज्यामुळे अंशूला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. नायजेरीयाच्या Adekuoroye हिने कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे.


बजरंग, दीपकसह साक्षीतं पदकही निश्चित


आज कुस्ती सामन्यांना सुरुवात होताच कुस्तीमध्ये भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी कमाल करत आपले पहिले सामने जिंकले आहेत. बजरंगने नॉरूच्या लॉवे बिंघमला 4-0 ने तर दीपक पुनियाने न्यूझीलंडच्या मॅथ्यूला 10-0 ने मात दिली. त्यानंतर पुरुषांच्या 65 किलोग्राम फ्रीस्टाइल गटात बजरंगने आधी उपांत्यपूर्व फेरीत मॉरीशसच्या कुस्तीपटूला आणि नंतर उपांत्य फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेनुसार इंग्लंडच्या जॉर्ज रॅमला मात देत फायनल गाठली आहे. दुसरीकडे दीपकने आधी 6-0 च्या फरकाने उपांत्यपूर्व फेरी जिंकली असून सेमीफायनलमध्ये कॅनडाच्या अॅलेक्झांडर मूरेला  3-1 च्या फरकाने मात देत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे.  तसंच फ्री स्टाईल 62 किलोग्राम गटात साक्षीने इंग्लंडच्या कुस्तीपटूला मात देत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली असून हे तिघेही सुवर्णपदकासाठी मैदनात उतरतील.


हे देखील वाचा-