Commonwealth Games 2022: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी अप्रतिम खेळाचं दर्शन घडवलं. क्रिकेट सोडता जवळपास सर्व स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत विजयश्री मिळवली. यावेळी भारताने बॅडमिंटन, बॉक्सिंग अशा खेळात पाकिस्तानला मात दिली. तर महिला हॉकी संघाने घानाला (India vs Ghana) मात दिली. स्विमिंगमध्ये श्रीहरी नटराजने पहिला सामना जिंकत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली. 


टेबल टेनिस


महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय जोडी रिथ टेनिसन (Reeth Tennison) आणि श्रीजा अकुलानं (Sreeja Akula) दमदार कामगिरी केली. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतीय जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड्स (Lailaa Edwards) आणि दानिशा पटेलला (Danisha Patel) पराभूत करत कॉमनवेल्थ मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत मनिका बत्रानं मुशफिकुह कलामचा 11-5 अशा फरकानं पराभव केला. अचिंत शरथ कमल आणि साथियान ज्ञानशेखरन यांच्या नेतृत्वाखाली भारताने सोलिहुलमध्ये राष्ट्रीय प्रदर्शनी केंद्र (एनईसी) येथे कॉमनवेल्थच्या टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष संघाने सुरुवातीच्या सामन्यात बारबाडोसला 3-0 ने मात दिली.


लॉन बाउल्स आणि स्विमिंग


भारताला पहिल्या दिवशी लॉन बाउल्स आणि स्विमिंगमध्ये (50 मी. आणि 400 मी. बटर फ्लाय) तसंच सायक्लिंगमध्ये पराभव पत्करावा लागला. पण स्विमिंगमध्ये श्रीहरी नटराजने पहिला सामना जिंकत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली. 


बॉक्सिंग


पहिल्या दिवशी भारताचा बॉक्सर शिव थापा (Shiv Thapa) याने पाकिस्तानच्या सुलेमान बलोचला (Suleman Baloch) याला 5-0 च्या फरकाने मात देत 63 किलो वजनी गटात पहिला विजय मिळवला आहे.


क्रिकेट


कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाच्या पदरी निराशा पडलीय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघानं 20 षटकात आठ विकेट्स गमावून ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघानं सात विकेट्स गमावून एकोणीसव्या षटकातच भारतावर विजय मिळवला.


हॉकी


भारतीय महिला हॉकी संघाने घानाला (India vs Ghana) 5-0 च्या तगड्या फरकाने मात देत स्पर्धेत पहिला-वहिला विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताची अनुभवी हॉकीपटू गुरजीत कौरने सर्वाधिक दोन गोल केले.


हे देखील वाचा-