एक्स्प्लोर

इंग्लंडमध्ये भारताच्या कामगिरीवरुन प्रशिक्षक रवी शास्त्री ट्रोल

भारतीय संघाच्या कामगिरीवर नाराज टीम इंडियाचे चाहते प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर राग व्यक्त करत आहेत.

लंडन : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाच्या अतिशय वाईट कामगिरीवरुन क्रिकेट चाहते मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रोल करत आहेत. भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर वनडे आणि कसोटी मालिका गमावली. आता कसोटी मालिकेतील अखेरचा सामना गमावण्याचं संकट टीम इंडियावर ओढावलं आहे. भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर नाराज टीम इंडियाचे चाहते प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर राग व्यक्त करत आहेत. मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पुन्हा एक फ्लॉप सिद्ध झाली आहे. इंग्लंडने सामन्याच्या चौथ्या दिवशी चहापानानंतर काही वेळातच आठ विकेट्सच्या मोबदल्यात 423 धावा बनवून डाव घोषित केला. इंग्लंडने भारतासमोरा विजयासाठी 464 धावांचं लक्ष्य ठेवलं. याच्या प्रत्युत्तरादाखल भारतने आपल्या तीन मोठ्या विकेट्स फक्त दोन धावांच्या मोबदल्यात गमावले. पहिल्यांदा शिखर धवन, मग चेतेश्वर पुजारा आणि नंतर विराट कोहली शून्यावर बाद झाला. चाहते संघाच्या या कामगिरीवर अतिशय नाराज आहेत. संतापलेल्या अनेक चाहत्यांनी रवी शास्त्रींना विजय माल्यासह तिथेच (इंग्लंड) राहण्याचा सल्ला दिला. तर शास्त्री लवकरच कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री करताना दिसतील, असं कॉमेडियन सुरेश मेनन यांनी म्हटलं आहे. विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांनी रवी शास्त्रींना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली आहे, असं एकाने लिहिलं आहे. अनेकांनी भारतीय फलंदाजांचीही थट्टा केली. जगातील सर्वात उत्तम फलंदाज कोण आहे, शिखर धवन की हार्दिक पटेल? असा एका युझरने लिहिलं आहे. बीसीसीआयने खेळाडूंसह प्रशिक्षकांना अॅडव्हान्स सॅलरी दिली आहे. 18 जुलै पासून 17 ऑक्टोबर 2018 पर्यंत संघासोबत राहण्यासाठी आणि खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी रवी शास्त्री यांना अॅडवान्समध्ये 2.5 कोटी रुपये दिले आहेत. शास्त्रींना वर्षाला 8 कोटी रुपये मिळतात.

महत्त्वाच्या बातम्या

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget