एक्स्प्लोर

IPL 2019 Qualifier 2 | चेन्नईकडून दिल्लीचा 6 विकेट्सनी धुव्वा, फायनलमध्ये मुंबईशी सामना

क्वालिफायर टू सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला वीस षटकांत 9 बाद 147 धावांत रोखलं होतं. चेन्नईने या सामन्यात दिल्लीचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला.

चेन्नई : आयपीएलच्या इतिहासात यंदा चौथ्यांदा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्येच फायनल पाहायला मिळणार आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने विशाखापट्टणममधल्या क्वालिफायर टू सामन्यावर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. चेन्नईने या सामन्यात दिल्लीचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला. चेन्नईच्या गोलंदाजांनी आधी दिल्ली कॅपिटल्सला वीस षटकांत 9 बाद 147 धावांत रोखलं होतं. पण चेन्नईच्या फॅफ ड्यू प्लेसी आणि शेन वॉटसननं 81 धावांची सलामी देऊन दिल्लीच्या आव्हानातली हवाच काढून घेतली. ड्यू प्लेसी आणि वॉटसन या दोघांनीही वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. ड्यू प्लेसीने 39 चेंडूंत 50, तर वॉटसनने 32 चेंडूंत 50 धावांची खेळी उभारली. त्या दोघांनी रचलेल्या पायावर चेन्नईने विजयाचा कळस उभारला. त्याआधी, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने वीस षटकांत नऊ बाद 147 धावांची मजल मारली होती. दिल्लीचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत या सामन्यात आपल्या लौकिकाला पुन्हा जागला. पण समोरच्या एंडने तोडीची साथ न लाभल्याने त्यालाही सढळ हातांनी मोठे फटके खेळता आले नाहीत. या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करुन दिल्लीला नऊ षटकांत तीन बाद 59 असं रोखलं होतं. त्या कठीण परिस्थितीत मैदानात उतरलेल्या रिषभ पंतने एक खिंड लावून धरली आणि दिल्लीची धावगती सातत्याने उंचावत ठेवली. त्याने 25 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह 38 धावांची खेळी उभारली. महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वोत्तम मॅचफिनिशर ही बिरुदावली गेली अनेक वर्ष अभिमानानं मिरवली. वाढतं वय आणि थकलेलं शरीर यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला धोनीचा तो लौकिक आता ओसरला आहे. पण आयपीएलच्या रणांगणात चेन्नईचा 'थाला' अजूनही ट्वेन्टी ट्वेन्टीचा सुपर किंग आहे. आयपीएलच्या अंतिम फेरीमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात यंदा चौथ्यांदा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्येच फायनल होणार आहे. त्यामुळे कोणता संघ आयपीएलची ट्रॉफी उंचावणार, याची दोन्ही टीम्सच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
IND vs ENG 2nd ODI: कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
ICC :  वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदताच क्रिकेटप्रेमींनी संभाव्य समीकरण शोधून काढलं
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदलताच क्रिकेटप्रेमींनी अंदाज बांधला

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Embed widget