(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lionel Messi - BYJU's : स्टार फुटबॉलर मेस्सी भारतीय कंपनी Byju's चा ग्लोबल अॅम्बेसिडर
Lionel Messi News : जागतिक फुटबॉलमधील (Football) अव्वल दर्जाचा खेळाडू आणि अर्जेंटीना संघाचा कर्णधार मेस्सी हा भारतातील एक सर्वात मोठी एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी बायजूचा ग्लोबल अॅम्बेसिडर झाला आहे.
Lionel Messi BYJU's Global Brand Ambassador : जागतिक फुटबॉलचा अनभिषिक्त सम्राट लिओनल मेस्सी (Lionel Messi) हा भारतातील सर्वात मोठी एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी बायजूस (Byjus) कंपनीचा ग्लोबल अॅम्बेसिडर बनल्याचं कंपनीनं नुकतच कळवलं आहे. बायजूस ही एक भारतीय शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी आहे. ज्याचे मुख्यालय बंगळुरु इथं आहे. ही कंपनी 2011 मध्ये स्थापन करण्यात आली असून अलीकडे खासकरुन लॉकडाऊनच्या काळात कंपनी बरीच प्रसिद्ध झाली. कोरोनाकाळात लोकांना घरी बसून राहावे लागल्याने ऑनलाईन शिक्षण महत्त्वाचं झालं, ज्यामुळे बायजूस कंपनी अधिक प्रसिद्ध झाली. दरम्यान आता कंपनीने थेट मेस्सी सारख्या जागतिक स्टारला आपला अॅम्बेसिडर केल्याने त्यांची प्रसिद्ध भारतासह जगभरात होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे.
बायजूसच्या 'एज्यूकेशन फॉर ऑल' या खास उपक्रमांतर्गत मेस्सी त्याचा ग्लोबल अॅम्बेसिडर असणार आहे. सर्वांना समान शिक्षण या उपक्रमासाठी बायजूस कंपनी काम करत असून यासाठीच मेस्सीही आता प्रमोशन करणार आहे. काही दिवसांपूर्वीच बायजूस कंपनी फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेचे ऑफिशियल स्पॉन्सर झाले होते. ज्यानंतर त्यांनी स्टार फुटबॉलर मेस्सीला कंपनीचा ग्लोबल अॅम्बेसिडर केलं आहे.
Lionel Messi is BYJU'S ambassador of 'Education for All'
— ANI Digital (@ani_digital) November 4, 2022
Read @ANI Story | https://t.co/crcTrWKGLq#LionelMessi #byjus pic.twitter.com/Y7bxeoTeR5
काय काम करते बायजूस?
तर भारताती एक सर्वात मोठी शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी म्हणून बायजूस ओळखली जाते. बायजूस कंपनी हे अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देते. ज्याद्वारे मुले घरी बसून अभ्यास करु शकतात. बायजू हे अधिकृतपणे थिंक अँड लर्न नावाचे ऑनलाइन एज्युकेशन स्टार्टअप आहे. बायजू भारतात ऑनलाईन शिकवण्यात आघाडीवर आहे. बायजूने भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोमध्येही मुलांना शिक्षण देण्यास शिकवायला सुरुवात केली आहे.
यंदाचा विश्वचषक मेस्सीचा अखेरचा वर्ल्ड कप
मेस्सी हा अर्जेंटीनाचा कर्णधार असला तरी जगभरात तो प्रसिद्ध आहे, त्याच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या खेळामुळे. पण हाच मेस्सी लवकरच निवृत्त होणार आहे. त्याने स्वत:च यंदाचा कतारमध्ये होणारा फिफा विश्वचषक 2022 हा त्याचा अखेरचा विश्वचषक असणार हे स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी ईएसपीएनशी (ESPN-Argentina) बोलताना मेस्सीने हे वक्तव्य केलं होतं. 35 वर्षीय मेस्सीने आजवर अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. पण इतक्या अप्रतिम खेळीनंतरही मेस्सीला आजवर एकदाही आपल्या देशाला अर्जेंटीनाला विश्वचषक जिंकवून देता आला नाही. त्यानंतर आता यंदाचा विश्वचषक त्याचा अखेरचा असेल हे त्याने स्वत: सांगतिलं असून तो म्हणाला,"हा नक्कीच माझा शेवटचा विश्वचषक आहे. मला शारीरिकदृष्ट्या चांगलं वाटत आहे, मी या वर्षी प्री-सीझनमध्ये खूप चांगली कामगिरी करू शकलो, जे मी गेल्या वर्षी करू शकलो नाही. मी जिथे आहे तिथे पोहोचणे आवश्यक होतं ते देखील चांगल्या मनस्थितीने. पण यंदाचा विश्वचषक माझा अखेरचा विश्वचषक असेल हे नक्की आहे.''
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI