Footballer Pele Health update : ब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती सध्या नाजूक झाल्याचं समोर येत आहे. पेले कर्करोगाशी लढा देत असून आता त्यांची अवस्था बिकट असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या कुटुंबियांनी शेअर केलेल्या एका पोस्टमधून हे दिसून येत आहे. सध्या त्यांचे संपूर्ण कुटुंब साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात जमा झाले आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते अजूनही रुग्णालयात आहेत. आता त्यांच्या मुलाने पेले यांचा हात धरलेला एक भावनिक फोटो शेअर करत 'बाबा.... माझी ताकद तुमची आहे' असं कॅप्शन दिलं आहे.
फुटबॉल जगतात अनेक फुटबॉलर्सचं विश्वचषक जिंकणं स्वप्न असतं, अशामध्ये तब्बल तीन वेळा विश्वचषक विजेतेपद पटकावणारा एकमेव खेळाडू असलेले पेले सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांचा कर्करोग आता पुढच्या टप्प्यात पोहोचला आहे, त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पेले यांना मागील वर्षी कोलन ट्यूमर काढण्यात आला होता. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेले केमोथेरपीला प्रतिसाद देत नाहीत. पेले यांच्या कुटुंबीयांनी हे वृत्त नाकारलं असलं तरी नुकताच पेले यांचा मुलगा एडिन्होने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने पेले यांचा हात धरलेला एक भावनिक फोटो शेअर करत या पोस्टला, 'बाबा.... माझी ताकद तुमची आहे' असं कॅप्शन दिलं आहे. यावरुन पेले यांची प्रकृती नाजूक असल्याचं दिसून येत आहे. ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पेले यांना 30 नोव्हेंबर रोजी अल्बर्ट आईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधी सप्टेंबर 2021 मध्ये त्यांना ट्यूमर असल्याचं समोर आलं होतं. पेले यांच्या कोलनमध्ये ट्यूमर होता. तेव्हापासून ते हॉस्पिटलमध्ये ये-जा करू लागले. मात्र, आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून ते कॅन्सरशी लढताना दिसत आहेत.
पेले फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट
ब्राझीलचे महान टबॉलपटू पेले हे फुटबॉल जगताचे अनभिषिक्त सम्राट आहेत. त्यांना अगदी फुटबॉलचा देवही म्हटले जाते. ते फुटबॉल कारकिर्दीत फॉरवर्ड म्हणून खेळत असंत, त्यांना सर्वकालिन महान फुटबॉलपटू असंही म्हटलं जातं. फिफानेही पेले यांना महान खेळाडूचं लेबल दिलं आहे. ते त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी फुटबॉलपटू मानले जात होते.
हे देखील वाचा-