Tunisha Sharma Death Latest News : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या आत्महत्येप्रकरणी तुनिषाची आई वनिता यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे. आत्महत्येपूर्वी तुनिषा आणि शिझान यांनी एकत्र जेवण केलं असल्याचं आईने सांगितलं आहे. 


आत्महत्येपूर्वी तुनिषा आणि शिझान यांनी एकत्र जेवण केलं असल्याने आता दोघांच्याही मोबाईलची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे. तुनिषा आणि शिझान यांचा 15 दिवसांपूर्वी ब्रेकअप झाला होता. दोघंही एकमेकांसोबत बोलत नसताना त्यांनी एकत्र जेवण कसं केलं असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 


शिझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तुनिषा डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळे तुनिशाची आई अनेकदा मालिकेच्या सेटवर जाऊन तिच्यावर लक्ष ठेवत होती. तुनिषाच्या आत्महत्येच्या 15-20 मिनिटांपूर्वी तुनिषाच्या आईने तिची विचारपूस करण्यासाठी ड्रायव्हरला फोन केला होता. त्यावेळी ड्रायव्हरने माहिती दिली होती की, तुनिषा शिझानसोबत असून दोघे गप्पा मारत आहेत. तसेच त्यांनी एकत्र जेवण केलं आहे. 


15-20 मिनिटांत नेमकं काय घडलं की त्यामुळे तुनिषाने आत्महत्या केली असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडला आहे. तुनिषा शर्माच्या आत्महत्येने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावर कमी कालावधीत यश मिळणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमकं काय घडलं यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिझानने चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती दिली आहे की, आत्महत्या करणाच्या काही दिवसांआधीदेखील तुनिषाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी शिझानने तिला वाचवलं. तसेच तुनिषाच्या आईला तिच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. तसेच तुनिषाने आत्महत्येच्या एक दिवसाआधीच जेवण करणं सोडलं होतं. तिने जेवण करावं यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण तिने नाकारलं". 


नेमकं प्रकरण काय? 


अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली आहे. या मालिकेतील तुनिषाचा सहकलाकार आणि तिचा खास मित्र शिझान मोहम्मद खान याच्या विरोधात तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तुनिषा आणि शिझान रिलेशनमध्ये होते. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला. त्यामुळे तुनिषा नैराश्याला बळी पडली होती. 



संबंधित बातम्या


Tunisha Sharma: तुनिषाच्या आत्महत्येचं खरं कारण समोर; पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय?