एक्स्प्लोर

...म्हणून शमीचं मॅचमध्ये लक्ष नाही : कोच

दिल्ली डेअरडेव्हिल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स मोहम्मद शमीबाबत बोलताना म्हणाला की, 'खासगी आयुष्यातील समस्यांमुळे त्याची कामगिरी खालावली आहे.'

मुंबई : आयपीएलच्या 11व्या मोसमात दिल्ली डेअरडेव्हिल्स नवी टीम आणि नव्या कर्णधारासह मैदानात उतरलं. मात्र, तरीही म्हणावी तशी त्यांची कामगिरी झाली नाही. सहापैकी पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ज्यामुळे गौतम गंभीरनं कर्णधारपद सोडलं. त्यामुळे आता कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरवर सोपवण्यात आली आहे. मात्र, तरीही संघाची समस्या मात्र कायम आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला रिटेन केलं होतं. पण नवा मोसम सुरु होण्याआधीच शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यामुळे आयपीएलमध्ये म्हणावी तशी छाप त्याला सोडता आली नाही. आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात त्याने फक्त 3 बळी घेतले आहेत. तर प्रति ओव्हर 9 च्या सरासरीने त्याने धावा दिल्या आहेत. दिल्ली डेअरडेव्हिल्सला शमीकडून अतिशय चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण तो तसं करु शकला नाही. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स याबाबत बोलताना म्हणाला की, 'खासगी आयुष्यातील समस्यांमुळे त्याची कामगिरी खालावली आहे.' 'मला वाटतं की, तो खासगी आयुष्यातील समस्यांशी झगडत आहे. अशावेळी लक्ष केंद्रीत होणं कठीण असतं. मैदानात चांगलं प्रदर्शन करण्याआधी तुम्ही तुमच्या समस्या मिटवण्याचा कायम प्रयत्न करता. पण तसं झालं नाही तर तुमचं मैदानात लक्ष केंद्रीत होत नाही. त्याला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच काही वेळ लागेल. पण हा सीजन त्याच्यासाठी अद्याप संपलेला नाही. अजूनही बरेच सामने शिल्लक आहेत.' असं होप्स म्हणाला. दरम्यान, शमीची पत्नी हसीन जहाँ हिने त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसात तक्रार केली आहे. तसंच तिने शमीवर मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोपही केले आहेत. याच दरम्यान, कार अपघातात तो गंभीर जखमीही झाला होता. या सर्व प्रकारामुळे त्याला आयपीएल सुरु होण्याआधी म्हणावा तसा सराव करता आला नाही. त्याचाच परिणाम आयपीएलमधील सामन्यांमध्येही पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा इंग्लंडमध्ये धुमाकूळ! नेट प्रॅक्टिसमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस, पाहा Video
15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा इंग्लंडमध्ये धुमाकूळ! नेट प्रॅक्टिसमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस, पाहा Video
Ishan Kishan No-1 T20I Batter : तख्तापलट! दोन वर्षं संघाबाहेर राहून सोसला अपमान... आता इशान किशन बनला टी-20 क्रिकेटचा राजा
तख्तापलट! दोन वर्षं संघाबाहेर राहून सोसला अपमान... आता इशान किशन बनला टी-20 क्रिकेटचा राजा
Ind VS Eng 1st T20I Rain Alert : एकही चेंडू न फेकता भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 सामना होणार रद्द? डरहममधून मोठी बातमी आली समोर
एकही चेंडू न फेकता भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 सामना होणार रद्द? डरहममधून मोठी बातमी आली समोर
Ind VS Eng 1st T20I Playing 11 : संजू सॅमसन OUT, 'या' वादळी खेळाडूची होणार एन्ट्री... IND vs ENG सामन्याआधी माजी क्रिकेटपटूने निवडली खतरनाक प्लेइंग-11, सगळे हैराण
संजू सॅमसन OUT, 'या' वादळी खेळाडूची होणार एन्ट्री... IND vs ENG सामन्याआधी माजी क्रिकेटपटूने निवडली खतरनाक प्लेइंग-11, सगळे हैराण

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Embed widget