मुंबई : क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लांइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम ) आणि क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड ऑफ इंडिया (सीएबीआय ) यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या आणि आजपासून मुंबईत सुरु झालेल्या दृष्टिहीन खेळाडूंच्या दुसऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मुंबईतील एमसीए मैदानावर हा क्रिकेटचा सामना रंगला होता.
या स्पर्धेत भारतीय संघाने 13.5 ओव्हरमध्ये 168 धावा काढून नवा विक्रम प्रस्थापित केला. तर दक्षिण आफ्रिकेला 157 धावांवर समाधान मानावे लागले.
मुंबईत सुरु असलेल्या दृष्टिहीन खेळाडूंच्या या टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टॉस भारताने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यास्पर्धेत भारताचा खेळाडू गणेश मुंडकर हा सामनावीर ठरला. दृष्टिहीन खेळाडूंचा हा अनोखा सामना याची देही याची डोळा पाहण्यासाठी अभिनेता अतुल कुलकर्णी, अभिनेता अनुपम खेर तसेच अनेक मुंबईतील उद्योग जगतातील अनेक गणमान्य व्यक्तीं हजर होते.
भारतीय संघाची कामगिरी :
जेनिफर इकबाल 38 चेंडूत 50 धावा
मोहम्मद फरहान 18 चेंडूत 21 धावा
गणेश मुंडकर 18 चेंडूत 44 धावा (मॅन ऑफ द मॅच )
दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी :
डेव्हिड लॅन्द्री 43 चेंडूत 42 धावा
सोलो भिडला 12 चेंडूत 19 धावा
हेनरी हाशा 15 चेंडूत 15 धावा