शिर्डी : केंद्र आणि राज्य सरकारला सामान्य माणसांचा विसर पडला आहे, असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी फिल्मी स्टाईल टीका केली आहे. काबिल, दंगल, व्हेंटिलेटर सिनेमांचा उल्लेख करत आपल्या हटके स्टाईलमध्ये विखेंनी सरकारवर निशाणा साधला.
“सामान्य माणसाचा सरकारला विसर पडला आहे, तर राज्य आणि केंद्रातील सरकार श्रीमंतासाठी काम करीत असून सत्तेवर राहण्यासाठी हे ‘काबिल’ नसल्याचं विखेंनी म्हटलं. तर, “राज्यात भाजपा-शिवसेनेची ‘दंगल’ सुरू असून, त्यांच्या पक्षातील नेत्यांना ‘व्हेंटिलेटर’वर पाठवण्याची वेळ आली आहे.”, असेही विखे म्हणाले.
आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत जनता सरकारला ‘व्हेंटिलेटर’वर पाठवेल, अशी टीका विखे यांनी केली आहे.