एक्स्प्लोर

एकही सामना न खेळता खासदार पप्पू यादवांचा मुलगा क्रिकेट संघात!

राजेश रंजन उर्फ पप्पू यादव बिहारच्या मधेपुरा तर त्यांची पत्नी रंजीत बिहारच्या सुपौल मतदारसंघातील खासदार आहेत.

नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात एकही सामना न खेळता, खासदार पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजनची दिल्लीच्या ट्वेण्टी 20 क्रिकेट संघात निवड झाली आहे. सार्थक रंजनची संघात निवड आणि अंडर-23 क्रिकेटचा टॉप स्कोअरर हितेन दलाल संघाबाहेर झाल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. राजेश रंजन उर्फ पप्पू यादव बिहारच्या मधेपुरा तर त्यांची पत्नी रंजीत बिहारच्या सुपौल मतदारसंघातील खासदार आहेत. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करुन प्रभावशाली नेत्याच्या मुलाची निवड केल्याने निवड समितीवर जोरदार टीका होत आहे. अतुल वासन, हरी गिडवानी आणि रॉबिन सिंह ज्युनिअर यांचा निवड समितीत समावेश आहे. याआधी कामगिरी संघात निवड याआधी मुश्ताक अली स्पर्धेतही सार्थक रंजनची निवड झाल्याने मोठा वाद झाला होता. या स्पर्धेत सार्थकने तीन सामन्यात केवळ 5, 3 आणि 2 धावाच केल्या होत्या. या मोसमाच्या सुरुवातीलाही सार्थकचा रणजी चषकाच्या संभाव्य संघांच्या यादीत समावेश केला होता. पण नंतर त्याने स्वत:च आपलं नाव मागे घेतलं होतं. सार्थकने क्रिकेटला रामराम ठोकला असून तो आता मिस्टर इंडिया कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी तयारी करत असल्याची चर्चा होती. पण आता अचानक मोसम संपताना, सार्थकची आई रंजीत रंजन यांनी डीडीसीएच्या प्रशासकीय न्यायमूर्ती विक्रमजीत सेन यांना ई-मेल पाठवला. माझा मुलगा डिप्रेशनमध्ये होता पण आता तो खेळण्यासाठी पूर्णत: फिट आहे. न्यायमूर्ती सेन यांनी हे पत्र निवडकर्त्यांना पाठवलं. "सार्थकची मानसिक परिस्थिती योग्य नव्हती. तो फिट झाल्यावर मी त्याला स्वत: पाहिलं आणि संभाव्य संघात समावेश केला," असं निवड समितीचे सदस्य अतुल वान सांनी सांगितलं. टॉप स्कोअरर संघाबाहेर मात्र त्या स्पर्धेत टॉप स्कोअरर असलेला हितेन दलालची संभाव्य संघात निवड न झाल्याने वाद वाढला आहे. दलालने सीके नायडू चषकात एक शतक आणि तीन अर्धशतकांसह 468 धावा केल्या होत्या. सार्थकच्या निवडीवर उपस्थित झालेल्या प्रश्नांवर न्यायमूर्ती सेन म्हणाले की, "निवड समितीने कोणाच्याही दबावाशिवाय संघाची निवड केल्याचा आम्हाला विश्वास आहे. सार्थकवर त्याच्या वडिलामुंळे लक्ष जात आहे." तर आई-वडील प्रभावी राजकारणी नसलेल्या हितेनसारख्या खेळाडूला असं सोडणं योग्य नाही, असं डीडीसीएच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. माझ्या मुलाविरोधात कट न खेळता माझ्या मुलाची निवड झाल्याचं म्हणणं चुकीचं असल्याचा दावा सार्थकची आई आणि खासदार रंजीत रंजन यांनी केला आहे. "माझा मुलगा अंडर 14 दिल्ली संघाकडून खेळत आहे आणि त्याच्या नेतृत्त्वात संघ चॅम्पियनही बनला आहे. मागील वर्षी अंडर 23 च्या सामन्यात 65, 40 आणि 193 धावा केल्या आहे. माझ्या मुलाविरोधात कट रचला जात आहे. मी त्याच्या प्रत्येक सामन्याची स्कोअरशीट देऊ शकते," असं रंजीत रंजन म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st Test Day-1 Time : पहाटे अलार्म लावा... भारत-न्यूझीलंड सामन्याची वेळ बदलली! पहिली कसोटी किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या सर्वकाही
पहाटे अलार्म लावा... भारत-न्यूझीलंड सामन्याची वेळ बदलली! पहिली कसोटी किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या सर्वकाही
IND vs NZ 1st Test Live Streaming : ना सबस्क्रिप्शन, ना अतिरिक्त खर्च! भारत-न्यूझीलंड पहिला कसोटी सामना FREE मध्ये पाहता येणार, कुठे आणि कसा? जाणून घ्या A टू Z
ना सबस्क्रिप्शन, ना अतिरिक्त खर्च! भारत-न्यूझीलंड पहिला कसोटी सामना FREE मध्ये पाहता येणार, कुठे आणि कसा? जाणून घ्या A टू Z
IND vs NZ 1st Test : न्यूझीलंडविरुद्ध उद्यापासून कसोटीचा थरार! गिल-राहुल परतले, बुमराहही सज्ज; 9 नवे चेहरे मैदानात उतरणार, अशी असेल टीम इंडियाची Playing XI
न्यूझीलंडविरुद्ध उद्यापासून कसोटीचा थरार! गिल-राहुल परतले, बुमराहही सज्ज; 9 नवे चेहरे मैदानात उतरणार, अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Vaibhav Sooryavanshi : बिहारचा संघ मैदानात उतरला, पण कर्णधार बदलला! वैभव सूर्यवंशी OUT, नेमकं काय घडलं?
बिहारचा संघ मैदानात उतरला, पण कर्णधार बदलला! वैभव सूर्यवंशी OUT, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News:
"आडनावापेक्षा गाडीच्या नंबरवरून ओळख!"; कोल्हापूरकरांच्या 'नाद खुळा' फॅन्सी नंबरची राज्यभर चर्चा, नंबरसाठी मोजले तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Uday Samant on BJP: मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
Beed Crime News: पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Shaina NC: सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
Sanjay Raut and Devendra Fadnavis : पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget