एक्स्प्लोर

मॅच फिक्सिंग आरोपावर मोहम्मद भाईचं मोठं वक्तव्य

शमी आणि त्याच्या पत्नीला मी इंग्लंडमध्ये भेटलो होतो, अशी कबुली मोहम्मद भाईने दिली.

नवी दिल्ली: टीम इंडियाचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यात सुरु असलेल्या वादात मोठा खुलासा झाला आहे. लंडनमध्ये राहात असलेल्या मोहम्मद भाईने शमीवरील मॅच फिक्सिंगचे आरोप फेटाळले आहेत. शमी पूर्णत: निर्दोष आहे. मॅच फिक्सिंगशी माझा किंवा शमीचा काहीही संबंध नाही, असं मोहम्मद भाईने एका मुलाखतीत सांगितलं. मात्र शमी आणि त्याच्या पत्नीला मी इंग्लंडमध्ये भेटलो होतो, अशी कबुली मोहम्मद भाईने दिली. मी क्रिकेटचा चाहता आहे. जग जसं शमीला ओळखतं, तसंच मी सुद्धा त्याला ओळखतो. इंग्लंडमधील कोणत्यातरी एका सामन्यादरम्यान शमीची आणि माझी ओळख झाली होती, असं मोहम्मद भाई म्हणाला. इतकंच नाही तर शमी एक चांगला माणूस आहे. शमी आणि त्याची बायको इंग्लंडमध्ये आले होते तेव्हा मी वेळात वेळ काढून त्यांना लंडन फिरून दाखवलं होतं, त्यांच्यासोबत जेवण केलं. त्यानंतर त्यांना विमानतळावर सोडायलाही गेलो होतो, अशी सगळी माहिती मोहम्मद भाईने दिली. माझ्यावरील मॅच फिक्सिंगचे आरोप चुकीचे आहेत. मी कोणतंही चुकीचं काम केलं नाही. मी गेल्या 25 वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहात असलो, तरीही माझ्या शरिरात भारताचंच रक्त आहे. कोणत्याही परिस्थितीत मी देशाशी गद्दारी करणार नाही. मी तिरंगा कधीही झुकू देणार नाही, असं मोहम्मद भाई म्हणाला. अलिश्बाला ओळखत नाही मोहम्मद शमीची पाकिस्तानी मैत्रिण आलिश्बाबत मोहम्मद भाईला विचारलं असता, मी अशा नावाच्या कोणत्याही मुलीला ओळखत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मी हे नाव पहिल्यांदाच मीडियातून ऐकल्याचं ते म्हणाले. VIDEO: अलिश्बाचा दावा पत्नी हसीन जहाच्या आरोपांनंतर अडचणीत आलेला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पाकिस्तानी मैत्रिण आलिश्बा  समोर आली. मॅच फिक्सिंगचे आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे असल्याचा दावा आलिश्बाने केला. शमी धोका कधीच देऊ शकत नाही, असं म्हणत चौकशीत सर्व प्रकारचं सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचं ती म्हणाली. आलिश्बासोबतच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट असल्याचा आरोप हसीन जहाने केला होता. ज्यामध्ये शारीरिक संबंध आणि पैशांची देवाणघेवाण करण्याविषयी चर्चा करण्यात आली. बीसीसीआय शमीला पैसे देत असताना तो पाकिस्तानी तरुणीकडून पैसे का घेतो, असा सवाल हसीन जहाने उपस्थित केला होता. दरम्यान, मोहम्मद शमीनेही हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला होता. संबंधित बातम्या
शमीवरील आरोप बिनबुडाचे, पाकिस्तानी तरुणी आलिश्बाचा दावा 
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमकडून हसीन जहांचीही चौकशी 
मोहम्मद शमी चांगला माणूस, महेंद्रसिंग धोनी पाठीशी
कोट्यवधींच्या 'हसीन फार्म हाऊस'चा वाद शमीला नडला?
दक्षिण आफ्रिकेतील महिलेसोबतही शमीचं अफेअर : हसीन जहां
फोन हरवल्यापासून शमी चांगलं वागायला लागला : हसीन जहा

महत्त्वाच्या बातम्या

Michael Hussey CSK IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
Shreyas Iyer IND vs WI 2nd T20 : रांचीमध्ये 249 धावाही कमी पडल्या! वेस्ट इंडिजने भारताला धुतलं, श्रेयस अय्यरने सांगितली भारताची सर्वात मोठी चूक, कुणाकुणाला झापलं?
रांचीमध्ये 249 धावाही कमी पडल्या! वेस्ट इंडिजने भारताला धुतलं, श्रेयस अय्यरने सांगितली भारताची सर्वात मोठी चूक, कुणाकुणाला झापलं?
IND vs WI 2nd T20 : अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग
अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग
IND vs WI 2nd T20 Score : शाई होपचं शतक! वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव
शाई होपचं शतक! वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
Michael Hussey CSK IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Embed widget