एक्स्प्लोर

रोहित, विराट, गेल....या महिला क्रिकेटरसमोर सगळेच फेल!

खरंतर आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाची महिला फलंदाज मॅग लॅनिंगच्या नावावर होता. लॅनिंगने 2014 मधील विश्वचषकात बांगलादेशच्या सिल्हटमधील आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 126 धावांची खेळी केली होती.

लंडन : क्रिकेटमध्ये चौकार-षटकारांचा उल्लेख होतो, तेव्हा ख्रिस गेल, विराट कोहली, रोहित शर्मा आणि एबी डिव्हिलियर्स यांसारखे फलंदाज डोळ्यासमोर येतात. मात्र ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर बेथ मूनीने असा विक्रम प्रस्थापित केला आहे की त्याच्यासमोर हे तमाम दिग्गज फलंदाज फेल आहेत. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20 सामन्यात बेथ मूनीने नाबाद 117 धावांची खेळी रचली. तिने 70 चेंडूच 19 चौकार आणि 1 षटकाराने ती आपली खेळी सजवली. यासोबतच मूनीने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकण्याचा विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला. खरंतर आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाची महिला फलंदाज मॅग लॅनिंगच्या नावावर होता. लॅनिंगने 2014 मधील विश्वचषकात बांगलादेशच्या सिल्हटमधील आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 126 धावांची खेळी केली होती. तिने या खेळीत 18 चौकार आणि 4 षटकार ठोकले होते. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पुरुष क्रिकेटरने एकाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 19 चौकार ठोकण्याचा पराक्रम केलेला नाही. पुरुषांच्या टी-20 सामन्यात सर्वाधिक 14 चौकार ठोकण्याचा विक्रम संयुक्तरित्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि अॅरॉन फिन्च यांच्यासह दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल तर टॉप-30 मध्येही सहभागी नाही. तर विराट कोहली 23 व्या क्रमांकावर आहे. 7 ऑगस्ट, 2012 रोजी श्रीलंकेविरुद्धच्या पल्लेकेलमधील सामन्यात त्याने 68 धावांच्या खेळी 11 चौकार लगावले होते. भारतीय विक्रमाबाबत बोलायचं झाल्यास रोहित शर्माने टी-20 च्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक 12 चौकार ठोकले होते. 2 ऑक्टोबर, 2015 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 66 चेंडूत 106 धावांची खेळी रचली होती. यात त्याने 12 चौकार आणि 5 षटकार लगावले होते. सर्वाधिक चौकारांच्या यादीत तो तेराव्या स्थानावर आहे. सलामीवीर रोहित शर्मानंतर लोकेश राहुलचा नंबर आहे. 27 ऑगस्ट, 2016 रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या नाबाद 110 धावांच्या खेळीत 12 चौकार आणि 5 षटकार ठोकले होते. त्याने 51 चेंडूंचा सामना केला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Team India Victory Parade In Mumbai: विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
Abhishek Sharma T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये उधारीची बॅट अभिषेक शर्मासाठी ठरली Lucky; न्यूझीलंडविरुद्ध सगळे रेकॉर्ड मोडले!
टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये उधारीची बॅट अभिषेक शर्मासाठी ठरली Lucky; कुणाची बॅट घेऊन मैदानात उतरला?
Hardik Pandya And Gf Mahika Sharma Video: खांद्यावर तिरंगा, गळ्यात विश्वचषकाचं मेडल...; हार्दिक पांड्या गर्लफ्रेंडसोबत मैदानातच झोपला, नको नको ते केल्यानं सोशल मीडियावर संताप
खांद्यावर तिरंगा, गळ्यात विश्वचषकाचं मेडल...; हार्दिक पांड्या गर्लफ्रेंडसोबत मैदानातच झोपला, नको नको ते केल्यानं सोशल मीडियावर संताप

व्हिडीओ

Solapur Gas Shortage : इंधन तुटवड्यामुळे सोलापुरातील प्रसिद्ध सुधा उपहारगृह बंद होणार?
Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
अंबादास दानवेंनी भाजप नेत्याची कॉलर पकडली; पं.स. संभाजीनगरमध्ये सभापती निवडीपूर्वी राडा
अंबादास दानवेंनी भाजप नेत्याची कॉलर पकडली; पं.स. संभाजीनगरमध्ये सभापती निवडीपूर्वी राडा
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Embed widget