एक्स्प्लोर

ऑल हेल डाऊन टू द बिअर्ड मॅन, दाढीवाल्या क्रिकेटर्सचा डॅशिंक लूक

मुंबई: क्रिकेटवीरांच्या खेळाची जेवढी चर्चा होते, तेवढंच त्यांच्या हेअरस्टाईल आणि फॅशन सेन्सकडेही सगळ्यांचं लक्ष असतं. सध्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे ती विराट कोहलीच्या दाढीची. पण फक्त विराटच नाही, तर सध्याचे अनेक क्रिकेटर्स या 'रफ अँड टफ' लूकला पसंती देताना दिसतात. विराट कोहली टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या खोऱ्यानं धावा ओढतो आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेतही कोहलीनं पाच कसोटी सामन्यांतच 655 धावांचा रतीब घातला. विराटच्या या शानदार फॉर्मइतकीच त्याच्या दाढीची स्टाईलही लोकप्रिय होत आहे. Virat_1 एका जमान्यात, अंडर-नाईन्टीन टीमच्या दिवसांत विराट क्लीन शेव्ह लूकला पसंती द्यायचा. पण भारतीय संघात पाऊल टाकल्यापासून विराटनं दाढी राखायला सुरूवात केली. विराटच्या आक्रमक स्वभावाला त्याची दाढीही साजेशी ठरली आहे आणि ब्रँड विराटची ती ओळख बनली आहे. तसं विराटच्या खेळाची तुलना अनेकजण वेस्ट इंडीजचे महान फलंदाज विव्ह रिचर्डस यांच्याशी करतात. पण विराट आणि रिचर्डसमध्ये आणखी एक साम्य आहे तो त्यांचा हाच दाढीवाला डॅशिंग लूक. अर्थात आजच्या जमान्यात दाढी राखणारा विराट काही एकटाच क्रिकेटर नाही. रवींद्र जाडेजा इंग्लंडविरुद्धची कसोटी गाजवणारा भारताचा अष्टपैलू रवींद्र जाडेजाही फॉर्म आणि स्टाईलच्या बाबतीत विराटला टक्कर देतोय. जाडेजा पिळदार मिशांसोबत अलीकडे दाढी वाढवू लागलाय. दाढी म्हणजे माझ्यासाठी आणि टीम इंडियासाठी लकी चार्म ठरल्याचं जाडेजानं गंमतीनं म्हटलंही होतं. Jadeja_3 धोनी कोहली आणि जाडेजाप्रमाणेच भारताच्या वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही दाढी शोभून दिसते. धोनीचा अनुभव आणि टीममधलं स्थान त्याच्या दाढीमुळं अधिक उठून  दिसतं. ऑल हेल डाऊन टू द बिअर्ड मॅन, दाढीवाल्या क्रिकेटर्सचा डॅशिंक लूक के एल राहुल टीम इंडियाचा डॅशिंग सलामीवीर के एल राहुलनेही राकट लूक दाढीने सजवला आहे. मैदानात उतरल्यानंतर चेहऱ्याला सन्सक्रिम लोशन लावलेल्या राहुलची दाढी आणखी उठून दिसते. ऑल हेल डाऊन टू द बिअर्ड मॅन, दाढीवाल्या क्रिकेटर्सचा डॅशिंक लूक मुरली विजय इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार फॉर्ममध्ये असलेल्या सलामीवीर मुरली विजयनेही दाढी ठेवली आहे. K L Rahul, Murli Vijay अजिंक्य रहाणे डॅशिंग मुंबईकर क्रिकेटर अजिंक्य रहाणेलाही त्याच्या चेहऱ्यावर दाढी शोभून दिसते. ऑल हेल डाऊन टू द बिअर्ड मॅन, दाढीवाल्या क्रिकेटर्सचा डॅशिंक लूक बेन स्टोक्स दाढी राखण्याच्या बाबतीत इंग्लंडचे खेळाडूही मागे नाहीत. एरवी क्लीन शेव्हला पसंती देणारा इंग्लंडचा बेन स्टोक्स भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटींमध्ये वेगळ्या अवतारात उतरला. स्टोक्सची लालसर केसांची दाढी सिंहाच्या आयाळीची आठवण करून देते. आणि स्टोक्स एखाद्या मध्ययुगीन योद्धासारखा भासतो. Stokes_5 मोईन अली स्टोक्सचा टीममेट आणि इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीला अजून भारत दौऱ्यावर आपली छाप पाडता आलेली नाही. मात्र त्याचा आत्मविश्वास कायम आहे. बर्मिंगहममध्ये जन्मलेल्या मोईन अलीनं धार्मिक कारणांमुळं दाढी राखली आहे. मोईन अलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीनंतर तर बेन स्टोक्सनं दाढीवाल्याची सगळ्यांनाच भीती वाटते, अशी टिप्पणी केली होती. Moeen_6 हाशीम अमला दाढीवाल्या क्रिकेटवीरांचा विषय निघालाय, तर दक्षिण आफ्रिकेच्या हशीम अमलाला विसरून कसं चालेल? खरं तर अमलानं धार्मिक कारणांसाठी दाढी राखली. पण त्याच्या खेळानं आणि लांब दाढीनंच आजच्या पिढीला क्लीन शेव्ह्ड लूक विसरायला भाग पाडलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. Amla_7 मिसबाह उल हक पाकिस्तानचा दिग्गज कर्णधार मिसबाह उल हक  वयाच्या 42व्या वर्षीही आपल्या टीमची धुरा समर्थपणे पेलताना दिसतोय. मिसबाहनं अलीकडेच दाढी राखण्यास सुरूवात केली आहे. ऑल हेल डाऊन टू द बिअर्ड मॅन, दाढीवाल्या क्रिकेटर्सचा डॅशिंक लूक मार्टिन गप्टील आणि विल्यमसन न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि कसोटी कर्णधार केन विल्यमसन यांनीही सध्याच्या ट्रेण्डला साजेशी दाढी राखली आहे. गप्टिल आणि विल्यमसनचा हिपस्टर लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतोय. ऑल हेल डाऊन टू द बिअर्ड मॅन, दाढीवाल्या क्रिकेटर्सचा डॅशिंक लूक ऑल हेल डाऊन टू द बिअर्ड मॅन, दाढीवाल्या क्रिकेटर्सचा डॅशिंक लूक अँटॉन डेव्हसिच किवी टीमचा डावखुरा फिरकी गोलंदाज अँटॉन डेव्हसिचची दाढी तर थेट इंग्लंडचे महान क्रिकेटवीर डब्ल्यू जी ग्रेस यांचीच आठवण करून देणारी आहे. ऑल हेल डाऊन टू द बिअर्ड मॅन, दाढीवाल्या क्रिकेटर्सचा डॅशिंक लूक या सर्व क्रिकेटवीरांचं राकट आणि कणखर व्यक्तीमत्व दाढीमुळं आणखी उठून दिसतंय.

महत्त्वाच्या बातम्या

Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up: 'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Embed widget