एक्स्प्लोर

बीसीसीआय विराट कोहलीचा हट्ट पूर्ण करणार?

मुंबई: बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीनं विराट कोहलीचा हट्ट मान्य करणार का? याबाबत सध्या बरीच चर्चा सुरु आहे. कारण की, रवी शास्त्री यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं जाणार अशी क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. पण अद्यापही याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. विराट कोहलीशी असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर अनिल कुंबळेनं भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळं टीम इंडिया मुख्य प्रशिक्षकाविनाच विंडीज दौऱ्यावर गेली होती. टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांशीही रवी शास्त्री यांचे चांगले संबंध आहेत. ऑगस्ट 2014 ते जून 2016 या काळात टीम इंडियाचे संचालक म्हणून काम केलेल्या रवी शास्त्री यांचे संघातील खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत. याचाच फायदा त्यांना होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि श्रीलंकेचे माजी कोच टॉम मुडी आणि सध्याचे अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे कोच लालचंद राजपूत यांनी अर्ज केले आहेत. पण बीसीसीआय कोणाच्या नावावर शिक्कमोर्तब करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रवी शास्त्रींची कारकीर्द : रवी शास्त्री हे भारतीय संघातील एक उत्कृष्ट अष्ट्रपैलू खेळाडू होते. त्यांनी 80 कसोटी आणि 150 वनडे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी 6000 हून अधिक धावा आणि 280 गडी बाद केले आहेत. भारतानं 1983 मध्ये पहिला विश्वचषक पटकावला. त्यावेळी या संघात रवी शास्त्रींचाही समावेश होता. संबंधित बातम्या: विराटशी चर्चा करुन प्रशिक्षकाची घोषणा करु : सौरभ गांगुली

रवी शास्त्री टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक असतील : सुनील गावसकर

प्रशिक्षकाचं नाव आज संध्याकाळपर्यंत जाहीर करा, 'त्रिमूर्ती'ला आदेश

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget