एक्स्प्लोर

धोनीला 'ते' ग्लोव्ज घालून खेळता यावे यासाठी बीसीसीआयचा पुढाकार, प्रशासकीय अध्यक्ष म्हणतात...

विश्वचषकातील भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने पॅरा कमांडोजच्या युनिफॉर्मवर दिसणारा बलिदान बॅज आपल्या विकेट किपिंग ग्लोव्जवर लावला होता. धोनीने ग्लोव्जवर लावलेला सेनादलाचा बलिदान बॅज काढून ठेवावा, अशी विनंती आयसीसीने बीसीसीआयला केली आहे.

मुंबई : विश्वचषकातील भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने पॅरा कमांडोजच्या युनिफॉर्मवर दिसणारा बलिदान बॅज आपल्या विकेट किपिंग ग्लोव्जवर लावला होता. धोनीने ग्लोव्जवर लावलेला सेनादलाचा बलिदान बॅज काढून ठेवावा, अशी विनंती आयसीसीने बीसीसीआयला केली आहे. त्यानंतर आता याप्रकरणावर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी धोनीच्या बाजूने भूमिका मांडली आहे. महेंद्रसिंग धोनीला विश्वचषकातल्या उर्वरित सामन्यांमध्येही त्याचे बहुचर्चित ग्लोव्ज परिधान करता यावेत, यासाठी बीसीसीआयने पुढाकार घेतला आहे. विनोद राय याबाबत म्हणाले की, आम्ही आमच्या खेळाडूंसोबत उभे आहोत. धोनीने ग्लोव्जवर लावलेला बॅज हा कोणत्याही धर्माचे प्रतीक नाही, तसेच धोनी जाहिरातबाजी म्हणूनही त्याचा वापर करत नाही. त्यामुळे धोनीला तो बॅज लावून खेळण्यात अडचण यायला नको. राय म्हणाले की, धोनीला हे बॅज ग्लोव्जवर लावून खेळता यावे, यासाठी आम्ही आयसीसीकडे मागणी करणार आहोत. यासंदर्भात बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. धोनीच्या मनात भारतीय सेनादलाविषयी आदराची भावना आहे. सेनादलाच्या पॅरा रेजिमेंटने त्याला मानद लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा देऊन सन्मानितही केले आहे. धोनीने विश्वचषक सामन्यात बलिदान बॅज असलेले ग्लोव्ज वापरुन भारतीय सेनादलाविषयीची आपल्या मनातली भावना पुन्हा अधोरेखित केली. धोनीच्या या कृतीची भारतीय चाहत्यांकडून खूपच प्रशंसा होत आहे. पण तो बॅज वापरणं नियमात बसत नसल्याचं सांगून, आयसीसीने धोनीला तो बॅज काढून ठेवायला सांगण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे. यावर धोनी काय करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. टीम इंडियाने विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सलामी दिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत केवळ 227 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने 48 षटकांत चार गडी गमावत हे आवाहन सहज पार केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Anmol Kumar Vinoo Mankad Trophy : 18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
IND vs WI 5th T20 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचही टी-20 सामन्यात बाहेर बसवलं; श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला समजवलं, काय काय म्हणाला?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचही टी-20 सामन्यात बाहेर बसवलं; श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला समजवलं, काय काय म्हणाला?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Embed widget