एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

30 एप्रिलनंतर IPL महाराष्ट्राबाहेर : हायकोर्ट

30 एप्रिलनंतर महाराष्ट्रात होणारे आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई हायकोर्टाने दुष्काळप्रश्नी आयपीएलच्या भवितव्याबाबत झालेल्या सुनावणीत सामने राज्याबाहेर नेण्याचे आदेश बीसीसीआयला दिले. सामन्यांच्या आयोजनासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन हायकोर्टाने 15 दिवसांची मुदत दिली आहे.   राज्यातील पाण्याची कमतरता आणि दुष्काळी परिस्थिती पाहून हायकोर्टाने हा निर्णय घेतला आहे. याचा फटका टीम ओनर्स आणि फ्रँचायझींना बसण्याची शक्यता असली, तरी एकूणच न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागतच होताना दिसत आहे.   मुंबई : आयपीएलच्या सामन्यांच्या भविष्यावर उच्च न्यायालयात आज निकाल लागणार आहे. आयपीएल सामन्यांवर उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत बीसीसीआयने दुष्काळी भागांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.   जितकं पाणी मैदानावर वापरु तितकंच दुष्काळी भागांना देऊ असं बीसीसीआयच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं आहे. शिवाय मुंबई आणि पुण्याच्या टीम्स मुख्यमंत्री रिलीफ फंडमध्ये 5 कोटी रुपये देणार असल्याचीही माहिती देण्यात आली.   आयपीएलसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी काही पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्यासाठी तयार आहात का असा सवाल मुंबई उच्च न्यायालायानं बीसीसीआयला विचारला होता. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयपीएलचे सामने व्हावे की नाही यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना कोर्टानं हा प्रश्न विचारला.   महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ आहे. अशा स्थितीमध्ये बीसीसीआय मुख्यमंत्री सहाय्यता निधीला काही मदत करु इच्छिते काय, असा सवालही कोर्टानं विचारला आहे. एका सामन्यासाठी किती पाणी वापरलं जातं याची माहिती देण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.   दुष्काळी परिस्थितीत राज्यात आयपीएल सामने खेळवण्याबद्दल रायझिंग पुणे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपलं मतं नोंदवलं होतं. सध्या दुष्काळाचा प्रश्न खरंच गंभीर आहे, मात्र आयपीएलचे काही सामने राज्याबाहेर हलवण्याने दुष्काळाच्या परिस्थितीत फरक पडणार नाही, त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं धोनीने म्हटलं होतं.  

संबंधित बातम्या :

IPL महाराष्ट्राबाहेर नेण्याचा विचार करा, कोर्टाचा BCCI ला सल्ला

आयपीएल महाराष्ट्राबाहेर नेल्याने दुष्काळात फरक नाही : धोनी

IPL: वानखेडेवरील सामन्यांसाठी पवारांचा मास्टरस्ट्रोक

माणसं महत्त्वाची की IPL? सामने राज्याबाहेर का नेत नाहीत? : हायकोर्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
PSL 2026 : कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
IPL Points Table 2026 : डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?
डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : आम्ही ममता बॅनर्जींसोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी, भाजपकडून निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं आसाम आणि बंगालमधील निवडणुकीची चोरी : राहुल गांधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्या सोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी : राहुल गांधी 
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Embed widget