मुंबई : ऑस्ट्रेलिया संघ लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते पाच वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहेत. या मालिकेचं वेळापत्रक आज (शुक्रवार) बीसीसीआयनं जाहीर केलं. यामध्ये गुवाहटी आणि तिरुअनंतपुरममध्ये पहिल्यांदाच आतंरराष्ट्रीय टी-20 सामने खेळवण्यात येणार आहे.
या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच वनडे सामने आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. तसंच या मालिकेआधी एक सराव सामनाही खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सराव सामना हा 12 सप्टेंबरला चेन्नईत खेळविण्यात येणार आहे.
वनडे मालिका वेळापत्रक
पहिली वनडे - 17 सप्टेंबर (रविवार) : चेन्नई
दुसरी वनडे - 21 सप्टेंबर (गुरुवार) : कोलकाता
तिसरी वनडे - 24 सप्टेंबर (रविवार) : इंदूर
चौथी वनडे - 28 सप्टेंबर (गुरुवार) : बंगळुरु
पाचवी वनडे - 1 ऑक्टोबर (रविवार) : नागपूर
टी-20 मालिका वेळापत्रक
पहिला टी-20 सामना - 7 ऑक्टोबर (शनिवार) : रांची
दुसरा टी-20 सामना - 10 ऑक्टोबर (मंगळवार) : गुवाहटी
तिसरा टी-20 सामना - 13 ऑक्टोबर (शुक्रवार) : हैदराबाद