एक्स्प्लोर

भारताविरुद्ध सेमीफायनल खेळण्यापूर्वी बांगलादेशची 'गर्जना'

लंडन : पहिल्यांदाच आयसीसी टूर्नामेंटमध्ये सेमीफायनलला धडक मारल्याने बांगलादेशच्या संघाचा आनंद गगनाला भिडला आहे. 15 जूनला बांगलादेशची टक्कर बर्मिंगहॅमच्या मैदानात बलाढ्य भारतासोबत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश करेल. सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर बांगलादेशने जोरदार सेलिब्रेशन केलं. बांगलादेशचा फलंदाज तस्कीन अहमदने सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये खेळाडू बांगलादेशी व्हर्जनमधील ‘हम होंगे कामयाब…’ या गाण्यावर सेलिब्रेशन करत आहेत. बांगलादेश फायनलचे स्वप्न पाहत असला तरी भारताशी मुकाबला करणं त्यांच्यासाठी एवढं सोपं नसेल. कारण गेल्या काही दिवसातल्या भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर भारताचं पारडं स्वाभाविकपणे जड दिसून येतं. टीम इंडियाने ब गटातून दोन विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. तर बांगलादेशने एक विजय मिळवला आणि दुसरा संघ बाहेर गेल्याने सेमीफायनलचं स्वप्न पूर्ण झालं. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला, ज्याचा फायदा बांगलादेशला झाला. टीम इंडियाने बांगलादेशला गेल्या वर्षी दोन टी-20 सामन्यांमध्ये पराभवाची धूळ चारली आहे. तर वन डेमध्ये बांगलादेशविरुद्ध भारताने 82 टक्के सामने जिंकले आहेत. सराव सामन्यात बांगलादेशचा लाजीरवाणा पराभव आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशची दाणादाण उडवली होती. भारताने तब्बल 240 धावांनी विजय साजरा केला होता. तर बांगलादेशचा संपूर्ण संघ शंभर धावांच्या आत म्हणजे केवळ 84 धावांवरच गुंडाळला होता. गतविजेत्या भारताची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात धडक मारण्याची ही पाचवी वेळ आहे. याआधी भारताने 1998, 2000, 2002, 2013 आणि आता 2017 मध्येही उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL News : हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
AUS vs BAN 2nd Test : 229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
Embed widget