एक्स्प्लोर

बॉल टॅम्परिंग: बंदीनंतर स्मिथला ड्युप्लेसीचा मेसेज

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने बॉल टॅम्परिंग करुनही, ड्युप्लेसीने स्मिथबाबत सहानुभूती व्यक्त केली आहे.

मुंबई:  क्रिकेटला जन्टलमन्स गेम का म्हणतात हे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्युप्लेसी दाखवून दिलं. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने बॉल टॅम्परिंग करुनही, ड्युप्लेसीने स्मिथबाबत सहानुभूती व्यक्त केली आहे. स्मिथला खूपच कडक शिक्षा ठोठावली आहे, असं फॅफ ड्युप्लेसीने म्हटलं आहे. ज्या संघाविरुद्ध स्मिथने षडयंत्र रचलं, त्याच संघाचा कर्णधार असलेल्या ड्युप्लेसीने हे वक्तव्य केल्याने, त्याच्या मोठेपणाचं कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी ड्युप्लेसीने पत्रकार परिषदेत आपलं मत मांडलं. “हा आठवडाच वादग्रस्त ठरला. स्मिथ सध्या ज्या परिस्थितीला सामोरं जात आहे, त्याच्याबद्दल मला सहानुभूती आहे”, असं ड्युप्लेसी म्हणाला. इतकंच नाही तर “मी स्मिथला मेसेजही केला. मला खरंच त्याच्याबद्दल मनापासून खूपच वाईट वाटतंय. अशी परिस्थिती कोणत्याही खेळाडूवर ओढवू नये. आता स्मिथला कणखर व्हावं लागेल”, असंही ड्युप्लेसीने सांगितलं. स्वत: ड्युप्लेसी दोन वेळा बॉल अयोग्य हाताळल्याप्रकरणात सापडला होता. त्याला दंडही झाला होता. स्मिथ ढसाढसा रडला बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथ पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला. आपली चूक झाली हे मान्य करताना तो पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला. डनीमध्ये पोहोचल्यानंतर त्याने पत्रकार परिषद घेतली आणि आपली चूक झाली, हे मान्य केलं. ''मला माफ करा. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून मी झाल्या प्रकाराची सर्व जबाबदारी स्वीकारतो. बॉल टॅम्परिंग माझी घोडचूक होती,'' अशी कबुली स्मिथने दिली. बॉल टॅम्परिंगप्रकरणी तीन जण दोषी बॉल टॅम्परिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट हे तिघे दोषी आढळले आहेत. स्मिथ आणि वॉर्नरवर ऑस्ट्रेलियाने 1-1 वर्षाची बंदी घातली आहे. तर बॅनक्रॉफ्ट 9 महिने संघाबाहेर असेल. काय आहे प्रकरण? ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. चेंडूशी छेडछाड केल्याची स्मिथकडून कबुली चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्टीव्ह स्मिथने माफी मागितली. ''चेंडूशी छेडछाड केल्यामुळे आम्हाला फायदा होईल, असं वाटलं होतं. संघ व्यवस्थापनाला याची माहिती होती. मात्र प्रशिक्षकांचा यामध्ये सहभाग नाही. ही अभिमानाची गोष्ट नाही. माझ्या नेतृत्त्वात पुन्हा अशी चूक होणार नाही,'' असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला होता. स्मिथला कर्णधारपदावरुन हटवा : ऑस्ट्रेलिया सरकार ही घटना धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील बातम्या सकाळी-सकाळी पाहून दुःख झालं. ऑस्ट्रेलिया संघाच्या या प्रकारामुळे विश्वासाला तडा गेला असल्याचंही ते म्हणाले. संपूर्ण देशाला शरमेने मान खाली लावायला लावणारी ही घटना आहे. त्यामुळे लवकरच क्रिकेट ऑस्ट्रेलिया यावर कारवाई करेन, अशी अपेक्षा करत असल्याचं टर्नबुल म्हणाले. त्यानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार आणि उपकर्णधारावर कारवाई केली. संबंधित बातम्या स्मिथ हमसून हमसून रडला, हळवा सचिन म्हणाला....  मला माफ करा, पत्रकार परिषदेत स्मिथ ढसाढसा रडला ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लिमन यांचा राजीनामा बॉल टॅम्परिंगमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मॅगलनने करार मोडला! बॉल टॅम्परिंग वादात शेन वॉर्नचा सचिन तेंडुलकरवर निशाणा 

महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
Team India Coach News : रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
Ryan Ten Doeschate News : भारतीय क्रिकेटला हादरवणारी एक्झिट! गौतम गंभीरचा सर्वात विश्वासू साथीदाराने अचानक दिला राजीनामा, थेट आयपीएलच्या बड्या टीमचा हात धरला
भारतीय क्रिकेटला हादरवणारी एक्झिट! गौतम गंभीरचा सर्वात विश्वासू साथीदाराने अचानक दिला राजीनामा, थेट आयपीएलच्या बड्या टीमचा हात धरला
IPL Trade News : CSKचा प्रस्ताव धुडकावला, पण दिल्लीने टाकला मोठा डाव! हार्दिक पांड्याच्या मोबदल्यात मुंबईला मिळणार 2 मोठे मॅचविनर्स, कोण आहेत ते?
CSKचा प्रस्ताव धुडकावला, पण दिल्लीने टाकला मोठा डाव! हार्दिक पांड्याच्या मोबदल्यात मुंबईला मिळणार 2 मोठे मॅचविनर्स, कोण आहेत ते?

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget