एक्स्प्लोर

स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा, ऑस्ट्रेलिया सरकारचे आदेश

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सीएने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे.

मुंबई : ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (सीए) स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सीएने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आहे. सीए या सर्व प्रकरणाची चौकशी करणार आहे. स्टीव्ह स्मिथनेही आपली चूक मान्य केली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सरकारने स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील बातम्या सकाळी-सकाळी पाहून दुःख झालं. ऑस्ट्रेलिया संघाच्या या प्रकारामुळे विश्वासाला तडा गेला असल्याचंही ते म्हणाले. संपूर्ण देशाला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. त्यामुळे लवकरच क्रिकेट ऑस्ट्रेलिया यावर कारवाई करेन, अशी अपेक्षा करत असल्याचं टर्नबुल म्हणाले. स्मिथकडून घटनेची कबुली चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्टीव्ह स्मिथने माफी मागितली. ''चेंडूशी छेडछाड केल्यामुळे आम्हाला फायदा होईल, असं वाटलं होतं. संघ व्यवस्थापनाला याची माहिती होती. मात्र प्रशिक्षकांचा यामध्ये सहभाग नाही. ही अभिमानाची गोष्ट नाही. माझ्या नेतृत्त्वात पुन्हा अशी चूक होणार नाही,'' असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला. संबंधित बातमी :

चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
Ajinkya Rahane Retirement : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
WI vs PAK 1st Test : कराची ते इस्लामाबाद सन्नाटा! आधी वेस्ट इंडिजने काढली इज्जत, अन् मग ICCने फिरवला चाबूक; पाकिस्तानच्या 2 खेळाडूंवर मोठी कारवाई
कराची ते इस्लामाबाद सन्नाटा! आधी वेस्ट इंडिजने काढली इज्जत, अन् मग ICCने फिरवला चाबूक; पाकिस्तानच्या 2 खेळाडूंवर मोठी कारवाई

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karj Mafi : कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16 लाख 96 शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी दोन महत्त्वाची कामं करावी लागणार 
कर्जमाफीची 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी,आधार प्रमाणीकरण करावं लागणार
Nashik Crime News: काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर
Embed widget