एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात अँड्र्यू टायचा समावेश
ऑस्ट्रेलिया संघ पाच वन डे सामन्यांच्या मालिकेनंतर भारत दौऱ्यात तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या संघात दुखापतग्रस्त पॅट कमिन्सऐवजी अँड्र्यू टायचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया संघ पाच वन डे सामन्यांच्या मालिकेनंतर भारत दौऱ्यात तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन करणारा अँड्र्यू टाय नुकताच दुखापतीतून सावरला आहे. यंदाच्या आयपीएलदरम्यान त्याचा खांदा निखळला होता. त्या दुखापतीतून सावरल्यानंतर टाय पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक























