एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
मॅक्सवेलचं वादळ, श्रीलंकेचा धुव्वा!
![मॅक्सवेलचं वादळ, श्रीलंकेचा धुव्वा! Australia Have Just Made The Highest T20i Total Ever मॅक्सवेलचं वादळ, श्रीलंकेचा धुव्वा!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/06222210/maxi-580x395-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पल्लेकले(श्रीलंका): श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या दमदार खेळीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-ट्वेंटीमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. मॅक्सवेलने 65 चेंडूत तूफानी 145 धावा ठोकल्या. ज्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावत 263 धावांचा डोंगर उभा केला.
यापूर्वी ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. श्रीलंकेने 2007 साली केनियाविरुद्ध खेळताना 260 धावा केल्या होत्या. मॅक्सवेलने 49 धावांत शतक पूर्ण केलं. यामध्ये 14 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियाच्या वतीने तिसऱ्या विकेटसाठी ट्रेविस हेड आणि मॅक्सवेल यांनी 109 धावांची भागीदारी केली. मात्र शेवटच्या चेंडूवर ट्रेडचा बळी घेण्यास श्रीलंकेला यश आलं. मॅक्सवेलची ही खेळी ट्वेंटी-ट्वेंटीमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी खेळी आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्याच एरॉन फिंचने इंग्लंडविरुद्ध 156 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)