एक्स्प्लोर

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेची नांदी

आता 2018 सालच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी 225 शिलेदारांचं भारतीय पथक सज्ज झालं आहे. पी. व्ही. सिंधूकडे भारतीय पथकाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे

मुंबई : ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट शहरात राष्ट्रकुलातल्या खेळाडूंचा मेळा सजला आहे. निमित्त आहे एकविसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं. या स्पर्धेला आजपासून सुरुवात होत असून, त्यात 19 क्रीडाप्रकारांमध्ये मिळून तब्बल 275 सुवर्णपदकं पणाला लागतील. भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे. 2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं 2006... मेलबर्न... 50 पदकं 2010... दिल्ली... 101 पदकं 2014... ग्लास्गो... 64 पदकं आणि आता 2018 सालच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी 225 शिलेदारांचं भारतीय पथक सज्ज झालं आहे. एशियाड आणि ऑलिम्पिकच्या धर्तीवर राष्ट्रकुलातल्या 71 देशांसाठी दर चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारा मल्टिगेम इव्हेण्ट म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. एका जमान्यात ब्रिटिशांच्या अमलाखाली असलेल्या देशांचा हा क्रीडामेळा न्यूझीलंडच्या हॅमिल्टनमध्ये पहिल्यांदा भरला तो 1930 साली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत पहिल्यांदा सहभागी झाला 1934 साली लंडनमध्ये. पण भारताचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला सहभाग खऱ्या अर्थानं उठून दिसला तो एकविसाव्या शतकात. मॅन्चेस्टर... मेलबर्न... दिल्ली... आणि ग्लास्गोतल्या सलग चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मिळून भारतीय खेळाडूंनी तब्बल 284 पदकांची लूट केली. त्यामुळे साहजिकच गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातून भारताच्या खजिन्यात किती पदकं जमा होतात, याविषयी क्रीडारसिकांच्या मनात नक्कीच उत्सुकता आहे. गोल्ड कोस्टच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 19 क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. त्यापैकी 14 क्रीडाप्रकारांमध्ये भारताचा सहभाग आहे. पण भारताला प्रामुख्यानं पदकांची अपेक्षा आहे ती अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, नेमबाजी, कुस्ती, स्क्वॉश आणि वेटलिफ्टिंग या खेळांमधून. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेची नांदी अॅथलेटिक्समध्ये भारताला भालाफेकपटू नीरज चोप्रा, थाळीफेकपटू सीमा पुनिया आणि उंच उडीतली अॅथलीट तेजस्विनी शंकर यांच्याकडून पदकाची आशा आहे. बॉक्सिंग रिंगमध्ये भारताची मदार ही प्रामुख्यानं विकास कृष्णन आणि एमसी मेरी कोमवर राहील. बॅडमिंटनच्या कोर्टवर ऑलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू, ऑलिम्पिक कांस्यविजेती सायना नेहवाल यांच्यासह किदम्बी श्रीकांतवर भारतीय क्रीडारसिकांचं लक्ष राहील. नेमबाजीत हिना सिद्धू, जीतू राय, मनू भाकेर यांचा अचूक लक्ष्यवेध भारताचं भाग्य उजळू शकतो. कुस्तीच्या मॅटवर सुशीलकुमार, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि राहुल आवारे ही भारताची आशास्थानं असतील. स्क्वॉश कोर्टवर दीपिका पाल्लिकल, जोशना चिन्नाप्पा आणि सौरव घोषाल हे भारतीय त्रिकूट वर्चस्व गाजवेल अशी चिन्हं आहेत. वेटलिफ्टिंग हा क्रीडाप्रकार भारतासाठी पदकांची खाण ठरु शकतो आणि त्याची सुरुवात विश्वविजेती मीराबाई चानूकडून होईल, असा विश्वास आहे. गोल्ड कोस्टच्या रणांगणात भारतीय खेळाडूंनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली, तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदककमाई नक्कीच उंचावलेली दिसेल. जकार्तातल्या आगामी एशियाडच्या दृष्टीनंही ती कामगिरी भारतीयांचा आत्मविश्वास उंचावणारी ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI : वेस्ट इंडिजचा दुसऱ्या टी 20 मध्ये भारतावर विजय, सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या चुकांचा पाढा वाचला
वेस्ट इंडिजचा दुसऱ्या टी 20 मध्ये भारतावर विजय, सुनील गावस्कर यांनी मॅचचा टर्निंग पॉईंट सांगितला, काय चुकले ते स्पष्ट केलं
IND vs WI 3rd ODI Playing XI : दोन बडे खेळाडू OUT, तर... एका पराभवानंतर उलथापालथीचे संकेत, तिसऱ्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI?
दोन बडे खेळाडू OUT, तर... एका पराभवानंतर उलथापालथीचे संकेत, तिसऱ्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI?
IND vs WI 2nd T20 : गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
AB De Villiers : जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं
जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget