Parul Chaudhary National Record : भारतीय धावपटू पारुल चौधरीने लॉस एंजेलिसमधील साऊंड रनिंग मीट दरम्यान राष्ट्रीय विक्रम केला आहे. पारूल महिलांच्या 3000 मीटर स्पर्धेत 9 मिनिटांपेक्षा कमी वेळ घेणारी देशातील पहिली धावपटू ठरली आहे. पारुलने शनिवारी रात्री आठ मिनिटे 57.19 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले. स्टीपलचेस तज्ज्ञ परळने सहा वर्षांपूर्वी दिल्लीतील सूर्या लोंगनाथनचा 9 मिनिटे 4.5 सेकंदाचा विक्रम मोडला.
पारुल शर्यतीत पाचव्या स्थानावर होती. पण शेवटच्या दोन लॅप्समध्ये दमदार कामगिरी करत तिला यश मिळालं. 3000 मीटर ही एक बिगर ऑलिम्पिक स्पर्धा आहे.
या महिन्यात अमेरिकेतील ओरेगॉन येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पारुलचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ती महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये आव्हान देईल. गेल्या महिन्यात चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसचे विजेतेपद पटकावले होते.
या यशानंतर पारूलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून पारूलचे तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.