Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गव्याचे दर्शन झाले आहे. हातकणंगले तालुक्यातील टोप संभापूर येथील गंधर्व या ठिकाणी गव्याचे दर्शन झाले. त्यामुळे गवा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

Continues below advertisement


गेल्या काही दिवसांपासून साधळे मादळे परिसर तसेच कासारवाडी परिसरात गव्याचे दर्शन होत आहे. आज सकाळी टोप संभापूरमधील चिन्मय गणाधीश  गंधर्वमध्ये गवा दिसून आला. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांनी वापरण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याबाबत माहिती मिळताच शिरोली एमआयडीसीमधील पोलिस स्टेशनचे कर्मचारी, वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून गव्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


इतर महत्त्वाच्या बातम्या