एक्स्प्लोर

गांगुलीला विचारा, त्याला माझा काय प्रॉब्लेम आहे : रवी शास्त्री

मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड न झाल्याने माजी संचालक रवी शास्त्री चांगलेच दु:खी असल्याचं दिसतंय. कारण इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवी शास्त्रींची नाराजी स्पष्ट दिसून आली.   सौरवा गांगुलीला माझा काय प्रॉब्लेम आहे, असा सवाल रवी शास्त्री यांनी विचारला. तसंच मुलाखत देणं हे माझं काम होतं, मात्र पडद्यामागे काय चाललं होतं, हे मला माहित नाही, असंही रवी शास्त्री एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.   नुकतीच टीम इंडियाच्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेंची निवड झाली आहे. मात्र या शर्यतीत सुरुवातीपासूनच रवी शास्त्रींचं नाव आघाडीवर होतं. मात्र ऐनवेळी अनिल कुंबळेंची एण्ट्री झाली आणि शास्त्री मागे पडले.   प्रशिक्षकपदी निवड न झाल्याने मला प्रचंड दु:ख झालं. मात्र आता या गोष्टीला आठवडा उलटला आहे. त्यामुळे आता काही फरक पडत नाही.  प्रशिक्षक कोण असावा? याबाबतचा निर्णय बोर्ड घेतं. कोणाला प्रशिक्षकपदाची जबाबदारी द्यावी, हा त्यांचा निर्णय आहे, असंही शास्त्रींनी नमूद केलं.   शास्त्रींच्या मुलाखतीतील काही भाग   अनिल कुंबळेची निवड पूर्वनियोजित होती? या प्रश्नाचं उत्तर देणं माझं काम नाही. मी टीम इंडियाचा डायरेक्टर होतो, तेव्हा संघ बांधणं माझं काम होतं. ते काम मी प्रामाणिकपणे, पूर्ण क्षमतेने केलं. भारतीस संघ आज प्रत्येक फॉर्मेटमध्ये जगातील पहिल्या दोन संघात आहे.   मुलाखत प्रक्रिया पारदर्शी होती? मुलाखत देणं हे माझं काम होतं, ते मी केलं. आतमध्ये काय सुरु होतं, हे मला माहित नाही.   तुझ्या मुलाखतीदरम्यान सौरव गांगुली बाहेर का गेला? मी सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलाखतीवेळी सौरव गांगुली उपस्थित नव्हता. मात्र गांगुलीला माझा काय प्रॉब्लेम आहे, हे मला विचारण्याऐवजी त्यालाच विचारा   मुलाखत कोणत्या मुद्द्यांवर आधारित होती? मी काही सीईओच्या जॉबसाठी मुलाखत देत नव्हतो. त्यामुळे क्रिकेट आणि टीम इंडियाच्या भवितव्याबाबत माझी सचिन तेंडुलकर, संजय जगदाळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत चांगली चर्चा झाली. माझ्या कार्यकाळात संघाची कामगिरीबाबतही बोलणं झालं. महत्त्वाचं म्हणजे खेळाडू यशासाठी भुकेले आहेत. आपण सध्या कसोटीत अव्वल स्थानी नाही, याचं कारण म्हणजे आपण गेल्या सहा महिन्यांपासून कसोटी खेळलीच नाही.   धोनीच्या कर्णधारपदाबाबत तुमचं म्हणणं काय? धोनी हा सध्याचा ग्रेटेस्ट क्रिकेटर आहे. तो ज्याप्रकारे धावा करतो, त्यामुळे तो संघातील उत्तम खेळाडू आहे. मला वाटतं त्याच्याकडे अजून तीन ते चार वर्ष क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. मात्र एखादा खेळाडू सर्व फॉर्मेटमध्ये क्रिकेट खेळत असेल, जसे की विराट कोहली, तर त्याच्याकडे आपण कर्णधार म्हणून पाहायला हवं. पण तो निर्णय निवड समितीचा आहे. पण मला वाटतं धोनीला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्यास तो सचिन, द्रविडप्रमाणे आणखी मोकळा होईल. तसंच तो कोणत्याही विशेषता कर्णधारपदाच्या दबावात खेळणार नाही.   वेस्ट इंडिज दौऱ्यावर समालोचक/कॉमेंटेटर म्हणून जाणार? समालोचक म्हणून नाही. जुलैच्या अखेर मी वेस्ट इंडिजमध्ये असेन. पण गॅरी सोबर्स यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Ind vs Aus U19 Series Update : भारतविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
Embed widget