मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023)  भारतीय पुरुष कबड्डी (Indian Men's Kabaddi Team) संघाने अंतिम फेरीत इराणचा (Iran) पराभव करत सुवर्णपदक (GoldMedal) पटकावले आहे. यामुळे भारताच्या (India) खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडलीये. भारताने अंतिम सामन्यात इराणचा 33-29 असा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला. हा सामना जिंकून यंदाचा आशिया स्पर्धांमधील कबड्डीचा किताब हा भारताने गतविजेत्या इराणचा पराभव करुन आपल्या नावावर करुन घेतला आहे. 


या सामन्यात काहीसा वाद झाला त्यामुळे सामन्याला देखील विलंब झाला. पण शेवटी निर्णय हा भारताच्या बाजूने देण्यात आला. तासाभराच्या वादानंतर शेवटी खेळ पुन्हा सुरु करण्यात आला आणि भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक आले. दरम्यान भारताची आशियाई स्पर्धांमधील घोडदौड ही सुरुच आहे. 


पाकिस्ताना हरवत अंतिम फेरीत प्रवेश 


पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर भारताने कबड्डीवर देखील उपांत्य फेरीत दणदणीत विजय मिळवला. भारताने 614 अशा फरकाने पाकिस्तानला चारी मुंड्या चित करत कबड्डीच्या अंतिम फेरी प्रवेश केला. दरम्यान, महिला कबड्डीच्या उपांत्य फेरीत भारताने नेपाळवर दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिलांनी 61-17 असा सरळ विजय मिळवून अंतिम फेरीत स्थान मिळवले. 


कबड्डीमध्ये महिलांची कामगिरी 


भारताच्या 'नारी शक्ती'ने आशियाई स्पर्धेतसुवर्ण कामगिरी केली आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं आहे. चीनचा पराभव करत भारताच्या नारी शक्तीने सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. भारतीय महिला कबड्डी संघाने चिनी तैपेईचा चित्तथरारक अंतिम फेरीत पराभव केला. भारताने चीनचा 26-25 अशा फरकाने पराभव केला आहे. महिला कबड्डी संघाने भारताला 27 वं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.


किक्रेटसंघाला देखील सुवर्णपदक 


ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील पुरुष भारतीय क्रिकेट संघानेही सुवर्णपदक पटकावले आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात अंतिम क्रिकेट सामना खेळला गेला. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. पावसामुळे सामन्यातील एकही डाव पूर्ण होऊ शकला नाही.  मात्र, सामना रद्द झाल्यानंतर रँकिंगमध्ये वरच्या स्थानावर असल्याने भारतीय संघाला विजेता घोषित करण्यात आले. याआधी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला भारतीय क्रिकेट संघानेही सुवर्णपदक जिंकले होते. महिला संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. 


भारताने गाठला 104 पदकांचा टप्पा


भारताच्या खेळाडूंनी आशियाई स्पर्धांमध्ये आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यामध्ये 104 पदकं सामील झाली आहेत. यामध्ये 28 सुवर्ण, 35 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे.पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर कायम असून आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 100 पदकांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.


हेही वाचा : 


Asian Games 2023 : चीनला धूळ चारत भारताच्या 'नारी शक्ती'नं सुवर्ण पदकावर कोरलं नाव! आशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाला 'गोल्ड'