Women Kabaddi Team India, Asian Games 2023 : भारताच्या 'नारी शक्ती'ने आशियाई स्पर्धेत (Asian Games 2023) सुवर्ण कामगिरी केली आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने (India Women Kabaddi Team) शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं आहे. चीनचा (China) पराभव करत भारताच्या (Team India) नारी शक्तीने सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. भारतीय महिला कबड्डी संघाने चिनी तैपेईचा चित्तथरारक अंतिम फेरीत पराभव केला. भारताने चीनचा 26-25 अशा फरकाने पराभव केला आहे. महिला कबड्डी संघाने भारताला 27 वं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.


आशियाई स्पर्धेत महिला कबड्डी संघाला सुवर्णपदक


भारतीय महिला कबड्डी संघाने चिनी तैपेईला अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात पराभूत करून सुवर्णपदक जिंकलं. महिला संघाने रोमहर्षक फायनलमध्ये तैवानचा 26-25 असा पराभव केला. आज पुरुष कबड्डी संघातही सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे. याशिवाय पुरुष क्रिकेट संघालाही सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये आज अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तान सोबत होणार आहे.






पंतप्रधान मोदी यांच्याकडून अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत महिला कबड्डी संघाचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. आमच्या कबड्डी महिला संघाने सुवर्णपदक जिंकलं आहे! हा विजय आमच्या महिला खेळाडूंच्या अदम्य भावनेचा पुरावा आहे. या यशाचा भारताला अभिमान आहे. संघाचे अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.' यासोबत केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही महिला कबड्डी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.






आतापर्यंत भारताला एकूण 102 पदकं


यंदाच्या आशियाई स्पर्धेतही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळत आहे. भारतानं पहिल्यांदा आशियाई स्पर्धेत 100 आकडा गाठला आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारताला एकूण 102 पदकं मिळाली असून यामध्ये 27 सुवर्ण, 35 रौप्य, 40 कांस्य पदकांचा समावेश आहे. आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकांची कमाई सुरुच आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Asian Games 2023 : मराठमोळ्या ओजसचा सुवर्णभेद, भारतासाठी जिंकलं तिसरं 'गोल्ड'; अभिषेकला रौप्यपदक