World Cup 2023 : विश्वचषक 2023 मध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया (India vs Australia) शी होणार आहे, पण त्याआधी टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. भारताचा सलामीवीर स्टार खेळाडू शुभमन गिल (Shubhman Gill) याला डेंग्यू (Dengue) झाला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे. सलामीवीर शिभमन गिल आजारी असल्यामुळे आता गिलच्या जागी कर्णधार रोहित शर्मासोबत कोण ओपनिंग करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. 


शुभमन गिलच्या जागी 'हा' खेळाडू घेणार?


या शर्यतीत ईशान किशन (Ishan Kishan) चे नाव आघाडीवर आहे. ईशान किशन रोहितसोबत ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सलामीवीर म्हणून उतरू शकतो. सोशल मीडियावरही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर ईशानच्या जागी केएल राहुलला संधी देण्यात येईल, असं काहीचं मत आहे. राहुलकडे ईशान पेक्षा जास्त अनुभव आहे, पण चेन्नईच्या खेळपट्टीवर स्फोटक फलंदाज शुभमनच्या जागी ईशान फिट असल्याचं अनेकांचं मत आहे.


ईशान किशनचा सलामीवीर म्हणून चांगला रेकॉर्ड


सलामीवीर असण्यासोबतच स्फोटक फलंदाज म्हणून लोकप्रिय असलेला ईशान किशनचा रेकॉर्ड चांगला आहे. ईशान संघात 3 आणि नंबर 4 स्थानावर देखील खेळला आहे, पण सलामीवीर म्हणून त्याचा रेकॉर्ड अधिक चांगला आहे. ओपनिंग करताना ईशानने 6 सामन्यात 70.83 च्या सरासरीने 425 धावा केल्या आहेत. यामध्ये एक द्विशतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. केएल राहुलने ओपनिंग करताना तीन शतके झळकावली आहेत. सोशल मीडियावर ईशान किशन सलामीला उतरणार अशी चर्चा सुरु आहे. 


रोहित शर्मा ईशानवर विश्वास ठेवणार?


तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ईशानने 4 सामने खेळले आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे, तर चौथ्या क्रमांकावर असताना त्याला खास कामगिरी करता आलेली नाही. ईशानच्या फलंदाजीचा क्रमांक नंबर पोझिशन सतत बदलत असते. आता गिलच्या अनुपस्थितीत कर्णधार रोहित शर्मा नेमका कुणावर विश्वास ठेवणार हे पाहावं लागणार आहे.


8 ऑक्टोबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना 


रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. 8 ऑक्टोबर रोजी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात सामना खेळणार आहे. हा भारताचा विश्वचषक 2023 मधील पहिला सामना असेल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकमेंकासमोर उभे ठाकणार आहेत.


महत्वाच्या इतर बातम्या :

Asian Games 2023 : चीनला धूळ चारत भारताच्या 'नारी शक्ती'नं सुवर्ण पदकावर कोरलं नाव! आशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाला 'गोल्ड'