एक्स्प्लोर

आशियाई स्पर्धा : 10 मिटर एअर रायफल शुटींगमध्ये भारताचा 'रौप्य'वेध

दीपक कुमारनं 247.1 गुणांची नोंद करत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. दीपकने पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत पदक मिळवले आहे.

जकार्ता : इंडोनेशियात सुरु असलेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही भारताच्या नेमबाजांनी आपली पदकांची मालिका सुरुच ठेवली आहे.  10 मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या दीपक कुमारने रौप्यपदकाची कमाई केली आहे. उत्तम कामगिरी करत भारतीय नेमबाजांनी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही भारताला पदक मिळवून दिले.  दीपक  कुमारनं 247.1 गुणांची नोंद करत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. दीपकने पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत पदक मिळवले आहे. पात्रता फेरीत भारताच्या रवी कुमार आणि दीपक  कुमार यांनी चांगला खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्या दिवशी कांस्यपदक मिळवलेल्या रवी कुमारनेही उत्तम खेळ करत आपलं आव्हान कायम राखलं होतं. पण अखेरच्या क्षणी अपेक्षित कामगिरी करता न आल्याने रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. दुसरीकडे दीपक कुमारच्या हातातून सामन्यावरील पकड निसटून जात होती. मात्र अत्यंत संयमी खेळ करत दीपकनं रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. स्पर्धेत सुवर्ण पदक चीनच्या यांग हाओराने जिंकले, तर कांस्य पदक शाओचुआन पटकावले. एशियाडमध्ये पहिल्या दिवशी भारताची कामगिरी पैलवान बजरंग पुनियाने जकार्ता एशियाडमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात बजरंगने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने अंतिम लढतीत जपानच्या ताकातानी दाईचीचं कडवं आव्हान 10-8 असं मोडीत काढलं. भारताचे नेमबाज अपूर्वी चंडेला आणि रवी कुमारने 18 व्या एशियाडमध्ये भारताला पहिल्या पदकाची कमाई करुन दिली. या जोडीने 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदक पटकावलं. संबंधित बातम्या  
'बजरंगा'ची कमाल, एशियाडमध्ये भारताला पहिलं सुवर्ण
आशियाई स्पर्धा : 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत भारताला 'कांस्य'
एशियाड : पात्रता फेरीतच पैलवान सुशील कुमारला पराभवाचा धक्का
45 देश, 36 खेळ, 572 खेळाडू आणि लक्ष्य एकच... एशियाडचं पदक

महत्त्वाच्या बातम्या

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Embed widget