Salman Butt on Team India: आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत टीम इंडियावर (Team India) अनेकांच्या नजरा असणार आहेत. दरम्यान टीम इंडिया सध्या सर्वांची फेव्हरेट टीम का आहे? यामागील कारण पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सलमान बट (Salman Butt) याने सांगितलं आहे. त्याला एका क्रिकेटप्रेमीने यंदाच्या आशिया कप 2022 स्पर्धेत भारतीय संघ फेव्हरेट असेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सलमानने हे वक्तव्य केलं आहे.

सलमान बट याने त्याच्या यू-ट्यूब चॅनलवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर देताना एक उत्तर दिलं. यामध्ये त्याने आगामी आशिया चषकात भारतीय संघ फेव्हरेट का आहे? याबाबत सांगितलं. सलमान म्हणाला,''आशिया कपमध्ये सहभागी होणारा कोणताही संघ स्पर्धा जिंकू शकतो. पण सध्या भारतीय संघ दमदार खेळ करताना दिसत आहे. अनुभवी आणि उत्तम दर्जाचे खेळाडू भारतीय संघा आहेत, त्यामुळे भारतीय संघाला फेव्हरेट मानलं जात आहे.''

27 ऑगस्टपासून सामन्यांना सुरुवात

आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाणार आहे. दरम्यान, सुपर 4 साठी 6 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना 3 सप्टेंबरला शारजहामध्ये होणार आहे. तर त्याचा शेवटचा सामना 9 सप्टेंबरला म्हणजे फायनलच्या दोन दिवस आधी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. सुपर फोरमधील पहिला सामना वगळता बाकीचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. 

आशिया चषकाचं संपूर्ण वेळापत्रक-

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान  बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई

हे देखील वाचा-