Independence Day 2022 India Pakistan: आज भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाली आहेत. देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधीच शेजारी देश पाकिस्तान देखील त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. 1947 ला दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळालं पण त्यापूर्वी इंग्रजांच्या राजवटीखाली एकच अखंड भारत होता, त्यामुळे भारताचा क्रिकेट संघही एक होता. पण फाळनीनंतर दोन वेगळे देश स्थापन झाले आणि भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघही वेगळे स्थापन झाले. अशामध्ये भारतीय संघातील काही क्रिकेटर्सही पाकिस्तान संघाकडून खेळू लागले. यातीलच तीन क्रिकेटर्सबद्दल आण्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


1. अब्दुल हफीज कारदार : अब्दुल यांचा जन्म लाहोरमध्ये 1925 साली झाला होता. त्यांनी भारतासाठी तीन कसोटी सामने खेळले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून खेळताना त्यांनी 23 कसोटी सामने खेळले. हफीज पाकिस्तान क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 927 कसोटी धावा करत 21 विकेट्स देखील घेतले. 


2.आमिर इलाही : भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघासाठी क्रिकेट खेळणारा आणखी एक खेळाडू म्हणजे आमिर इलाही. त्यानी भारतासाठी एक कसोटी सामना खेळला. तर पाकिस्तान संघाकडून खेळताना त्यांनी 5 कसोटी सामने खेळले. इलाही यांची कारकिर्दी अधिक मोठी नव्हती. पण त्यांचं स्थानिक क्रिकेटमधील प्रदर्शन जबरदस्त होतं. 125 प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी 2 हजार 562 रन केले. या दरम्यान त्यांनी 3 अर्धशतकं लगावली तसंच 513 विकेट्स देखील घेतले.


3.गुल मोहम्मद : आधी भारताकडून क्रिकेट खेळणारे गुल मोहम्मद फाळणीनंतर पाकिस्तानला गेले. त्यामुळे ते देखील दोन्ही संघाकडून क्रिकेट  खेळले आहेत. गुल यांनी भारतासाठी 1946 ते 1952 दरम्यान 8 सामने खेळले. त्यानंतर पाकिस्तानकडून ते एकच सामना खेळले असून एकूण 9 कसोटी सामन्यात त्यांनीट 205 रन केले.


हे देखील वाचा-