Independence Day 2022 Wish : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली असून आज भारताच 76 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. सोशल मीडियावर तर सकाळपासून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना विविध सेलिब्रेटी, क्रिकेटर्स अगदी खासप्रकारे शुभेच्छा देत आहेत. अशामध्ये इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसन (Kevin Petersen) याने देखील भारतीयांना  स्वातंत्र्य दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. खास यासाठी कारण केविनने हिंदीमध्ये ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक खास ट्वीट यावेळी केलं आहे.


काय म्हणाला केविन पीटरसन? 


केविन पीटरसनने हिंदीमध्ये ट्वीट करत लिहिलं आहे की, 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा भारत, अभिमान करा आणि उभं रहा. तुम्हा सर्वांसाठी एक चांगलं भविष्य उभारलं जात आहे. दरम्यान केविनचे लाखो फॉलोवर्स असल्याने अनेकांनी ही पोस्ट लाईक तसंच शेअर केली आहे. अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. 


वाचा ट्वीट - 






इंग्लंड कसोटी सामन्यांसाठी सज्ज


दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघात तीन कसोटी सामन्यंची मालिका 17 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे. WTC गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका सध्या अव्वल स्थानी  असून इंग्लंडचा संघ सातव्या नंबरवर आहे. दक्षिण आफ्रिका जर ही मालिका जिंकेल तर अंतिम सामन्यात खेळणाऱ्या दोन संघातील एक संघ म्हणून जवळपास निश्चित होईल. पण इंग्लंडचा संघ सध्या कमाल फॉर्ममध्ये असल्याने दक्षिण आफ्रिकेचं जिंकणं अवघड आहे. यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात डिसेंबर 2022 मध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडचा संघ सध्या दमदार फॉर्मात असला तरी मालिका पाकिस्तानात असल्याने त्यांच्याच भूमीत त्यांना मात देणं अवघड आहे. जर इंग्लंडला WTC गुणतालिकेत टिकून राहायचं आहे, तर त्यांना दक्षिण आफ्रिकेनंतर पाकिस्तानला मात ज्यावी लागेल. पण जर पाकिस्तान ही मालिका जिंकेल तर त्याचं अंतिम सामन्यात पोहोचणं काहीसं सोपं होईल.


हे देखील वाचा-