Indian Cricket Team, Asia Cup 2023 : मोठ्या वादानंतर अखेर आशिया चषक श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. पाकिस्तानमध्ये चार तर उर्वरित 9 सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत. 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर यादरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. यंदा आशिया चषक हायब्रिड पद्धतीने होणार आहे.  आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीमच होय.. कारण, त्यानंतर दोन महिन्यात वनडे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या आशिया चषकावर कोण नाव कोरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. आशिया चषकाच्या इतिहासावर नजर मारल्यास सर्वात यशस्वी संघ टीम इंडिया आहे. 

1984 पासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत 15 वेळा आशिया चषक स्पर्धा पार पडलीय. भारतीय संघ आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. भारतानं आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजेच सात वेळा आशिया चषकाचा खिताब जिंकलाय. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं सहा वेळा आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. या यादीत पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांना दोन वेळा आशिया चषक जिंकता आला आहे.  1984, 1988, 1990, 1995 भारताने आशिया चषकावर नाव कोरलेय. 1997 मध्ये श्रीलंकेनं आशिया चषकावर नाव कोरले होते. पाकिस्तानने 2000 मध्ये पहिल्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. 

 आशिया चषक विजेत्या संघाची यादी:

क्रमांक वर्ष विजयी संघ
1 1983/84 भारत
2 1985/86 श्रीलंका
3 1988/89 भारत
4 1990/91  भारत
5 1994/95  भारत
6 1997 श्रीलंका
7 2000  पाकिस्तान
8 2004  श्रीलंका
9 2008 श्रीलंका
10 2010  भारत
11 2011/12 पाकिस्तान
12 2013/14  श्रीलंका
13 2016  भारत (टी-20)
14 2018 भारत
15 2022 श्रीलंका

 

यंदा कुणाचे पारडे जड ? -

यंदाचा आशिया चषक एकदिवसीय पद्धतीने खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर आशिया चषकापासून टीम इंडियात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार आहे. पाकिस्तानच्या संघाकडूनही कडवी टक्कर मिळण्याची शक्यात आहे. बाबार आझमसह सर्व खेळाडू फॉर्ममध्ये आहेत.. त्याशिवाय श्रीलंका संघही विजयाचा दावेदार आहे. गतविजेत्या श्रीलंका संघही विजयाचा दावेदार आहे. श्रीलंकेचे सर्व सामने त्यांच्याच मैदानावर होणार आहेत. त्यामुळे या तीन संघामध्ये विजेतेपदाची स्पर्धा रंगणार आहे. 

यंदा आशिया कप एकदिवसीय स्वरुपात

यावेळची आशिया कप स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार असून एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी आशिया कप स्पर्धेच्या एका गटात भारत, पाकिस्तानसह नेपाळ हा संघ असेल. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहेत. यामध्ये एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कपमध्ये 6 सुपर 4 सामने होणार आहेत.

आणखी वाचा :

Asia Cup 2023 : मोठ्या वादावर पडदा, आशिया चषकाच्या तारखा ठरल्या, पाकिस्तानमध्ये भारत जाणार की नाही? अखेर निर्णय झाला!

IND vs PAK :  मौका... मौका... आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान महासंग्राम तीन वेळा होणार ?