Asia Cup 2022: अटीतटीच्या लढतीत श्रीलंकेनं बांगलादेशचा दोन विकेट्सनं पराभव केला आहे. या विजयासह श्रीलंकेनं सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे तर बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. बांगलादेशला आशिया चषकात एकही विजय मिळवता आलेला नाही. ब गटामध्ये याआधीच अफगाणिस्तानने सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता श्रीलंका संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. 

बांगलादेशनं दिलेलं 184 धावांचं आव्हान श्रीलंकेनं अखेरच्या षटकात दोन गडी राखून पार केले. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात 183 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून मेहदी हसन 38 आणि अफिफ हुसेन 39 यांनी महत्वाची खेळी केली. वानिंदु हसनंगा आणि चमिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. 

बांगलादेशनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने अश्वासक सुरुवात केली. पण नंतर ठरावीक अंतरानं गडी बाद झाल्यानंतर संघ अडचणीत सापडला होता. श्रीलंका संघाकडून कुसल मेंडिस याने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर दासुन शनाकाने महत्वाची 45 धावांचं योगदान दिलं. तर मोक्याच्या क्षणी असिता फर्नान्डो याने तीन चेंडूत 10 धावा चोपल्या.

ब गटामधून अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनी सुपर चारमध्ये प्रवेश केला आहे. तर अ गटामध्ये भारतीय संघानं सुपर 4 मधील आपलं स्थान पक्कं केले आहे. शुक्रवारी पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील विजेता संघ सुपर चारमध्ये प्रवेश करेल. तर पराभूत संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. 

श्रीलंका संंघाची फलंदाजी -

फलंदाजी

RB4s6s
पाथुम निसानका 201921
कुसल मेंडिस 603743
चरित असलंका 1300
दनुष्का गुणातिलका 11620
भानुका राजपाक्षे 2400
दासुन शनाका 453332
वानिंदु हसनंगा 2300
चमिका करुणारत्ने  161010
महिष थिक्षण नाबाद0200
असिता फर्नान्डो नाबाद10320

 

बांगलादेशची फलंदाजी - 

फलंदाजीRB4s6s
मेहेदी हसन 382622
शब्बीर रहमान 5610
शाकिब अल हसन 242230
मुशफिकुर रहीम 4500
अफिफ हुसेन 392242
महमुदुल्लाह 272211
मोसादैक होसैन 24940
महेदी हसन 1200
तस्कीन अहमदनाबाद11601
इबादत हुसेन    
मुस्ताफिजुर रहमान