Asia Cup :आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच श्रीलंका संघाला एक मोठा झटका बसला आहे. त्यांच्या संघातील महत्त्वाचा गोलंदाज दुष्मंता चमीरा (Dushmantha Chameera) सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेला मुकणार आहे. आशिया चषक 27 ऑगस्टपासून सुरु होणार असून सर्व संघ या भव्य स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. पण आधी भारताचा जसप्रीत बुमराह मग पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी असे मुख्य गोलंदाज स्पर्धेला मुकणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता श्रीलंकेचाही मुख्य गोलंदाज दुष्मंता चमीरा बाहेर झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान दुष्मंता चमीरा याच्या जागी श्रीलंकेच्या  20 सदस्यीय संघात नुवीन थुशारा (Nuwan Thushara) याला संधी देण्यात आल्याची महितीही समोर येत आहे. दुष्मंता चमीरा याने त्याच्या प्रदर्शनाने सर्वांनाच आतापर्यंत प्रभावित केलं आहे. यासोबतच त्याने आयपीएल 2022 मध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याच्या T20 कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंकेच्या या खेळाडूने आतापर्यंत 50 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. चमीराने 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 30.27 च्या सरासरीने आणि 8.14 च्या इकॉनॉमीने 48 विकेट घेतल्या आहेत. अशामध्ये त्याच्या या कमाल कामगिरीनंतर त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण आता तो दुखापतग्रस्त झाल्याने श्रीलंकेच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत.

कसं आहे वेळापत्रक?

यंदा भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंति सामना पार पडणार असून नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहूया...

सामनादिवसदिनांकसंघग्रुप ठिकाण 
1शनिवार27 ऑगस्टअफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंकाबीदुबई
2रविवार28 ऑगस्टभारत विरुद्ध पाकिस्तानदुबई
3मंगळवार30 ऑगस्टबांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान बीशारजाह
4बुधवार31 ऑगस्टभारत विरुद्ध पात्र संघदुबई
5गुरुवार1 सप्टेंबरश्रीलंका विरुद्ध बांग्लादेश बीदुबई
6शुक्रवार2 सप्टेंबरपाकिस्तान विरुद्ध पात्र संघशारजाह
7शनिवार3 सप्टेंबरग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2सुपर 4शारजाह
8रविवार4 सप्टेंबरग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2सुपर 4दुबई
9मंगळवार6 सप्टेंबरग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1सुपर 4दुबई
10बुधवार7 सप्टेंबरग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2सुपर 4दुबई
11गुरुवार8 सप्टेंबरग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2सुपर 4दुबई
12शुक्रवार9 सप्टेंबरग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2सुपर 4दुबई
13रविवार11 सप्टेंबरसुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2सुपर 4दुबई

हे देखील वाचा-