Pakistan vs Sri Lanka Live :  आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत आज अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान  (Sri Lanka vs Pakistan) या दोघांमध्ये रंगणार आहे. दोन्ही संघानी सुपर 4 मध्ये सर्वाधिक सामने जिंकत फायनलमध्ये धडक घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघाची स्पर्धेची सुरुवात पराभवाने झाली होती, श्रीलंकेला अफगाणिस्तानने तर पाकिस्तानला भारताने सलामीच्या सामन्यात मात दिली होती. त्यानंतर मात्र दोघांनी उर्वरीत सामन्यात कमाल कामगिरी करत थेट फायनलपर्यंत धडक घेतली आहे. आता या दोघांपैकी एकजण स्पर्धेचा खिताब जिंकणार असून नेमका हा सामना कधी, कुठे पाहता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज अर्थात 11 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील हा आशिया चषकाचा अंतिम सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामना सामना सुरु होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवला जाणार आहे.  


कुठे पाहता येणार सामना?


श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार (Hotstar) अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.    


अशी असू शकते संभाव्य अंतिम 11


श्रीलंका संघ:


दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, दिनेश चांदीमल.


पाकिस्तानचा संघ:


बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, नसीम शाह.


फायनल आधी श्रीलंकेचा पाकिस्तानवर विजय


आशिया चषक 2022 स्पर्धेत (Asia Cup 2022) अप्रतिम कामगिरी करत पाकिस्तान आणि श्रीलंका (Pakistan vs Sri Lanka) हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. पण या दोन्ही संघामध्ये फायनलपूर्वी शुक्रवारी सुपर 4 मधील अखेरचा सामना या दोघांमध्येच पार पडला. या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानला 5 गडी राखून मात दिली आहे. श्रीलंकेची चेस करताना सुरुवात खराब झाली असताना देखील सलामीवीर पाथुम निसांका याने टिकून राहून अर्धशतकी खेळी करत सामना जिंकवून दिला.  यावेळी श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत 19.1 षटकांत पाकिस्तानचा डाव रोखत त्यांना 121 धावांवर रोखलं. ज्यानंतर श्रीलंकेचा संघ 122 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आला असताना त्यांची सुरुवात खराब झाली. सुरुवातीचे काही गडी स्वस्तात बाद झाले. पण सलामीवीर पाथुम निसांका याने टिकून राहून अर्धशतकी खेळी करत सामना जिंकवून दिला. 


हे देखील वाचा-