Asia Cup 2022 Live Broadcast & Streaming : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) सुरू झाला आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामना 28 ऑगस्टला होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची जितकी चर्चा होत आहे ते पाहता ही स्पर्धा पाहणाऱ्या चाहत्यांची संख्या नवा विक्रम करणार असं दिसून येत आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा संघ आमनेसामने असतील, तेव्हा 132 देशांचे चाहते तो सामना लाईव्ह पाहू शकतील. भारत आणि पाकिस्तान या देशांशिवाय अन्य देशांचे क्रिकेटप्रेमीही या सामन्यासाठी उत्सुक असल्याने 132 देशांमध्ये हा सामना पाहण्याची सुविधा करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट प्रेमी कुठे पाहू शकतात सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार (Hotstar) अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल. तसंच डीडी स्पोर्ट्सवरही सामना पाहता येऊ शकतो. यावेळी रवी शास्त्री, इरफान पठाण, गौतम गंभीर, रसेल अर्नोल्ड, दीप दासगुप्ता, स्कॉट स्टायरिस, संजय मांजरेकर, वसीम अकरम, वकार यूनुस, अतहर अली खान हे दिग्गद कॉमेन्ट्री बॉक्मध्ये दिसतील.
आशिया कप 2022 ची लाईव्ह स्ट्रीमिंग
भारत: स्टार स्पोर्ट्स, डिज्नी+हॉटस्टार, डीडी स्पोर्ट्सपाकिस्तान: पीटीवी स्पोर्ट्स, टेन स्पोर्ट्स. दारज़ आणि तपमाडीवर लाईव्ह स्ट्रीमिंगबांग्लादेश: गाझी टीव्ही (जीटीवी)ऑस्ट्रेलिया: फॉक्स स्पोर्ट्सन्यूझीलंड: स्काय स्पोर्ट्सदक्षिण आफ्रिका: सुपरस्पोर्ट नेटवर्कयूएसए, कॅनडा, उत्तर अमेरिका: विलो टीवीयूके: स्काय स्पोर्ट्स नेटवर्कमध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका क्षेत्र: ओएसएन स्पोर्ट्स क्रिकेट एचडीअफगाणिस्तान: एरियाना टीवीकॅरेबियन: फ्लो टीवी
कसं आहे उर्वरीत ग्रुप स्टेजच्या सामन्यांचं वेळापत्रक?
28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान30 ऑगस्ट - बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंककाँग1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
ग्रुप स्टेजचे सामने झाल्यानंतर सुपर 4 चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी 2 संघ सामने खेळतील. यामध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
हे देखील वाचा-