Asia Cup Format & History : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेला आजपासून (27 ऑगस्ट) युएईमध्ये सुरुवात होत आहे. भारत आपला पहिला सामना रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK 2022) दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. अशात पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा असणार असून जवळपास 4 वर्षानंतर ही भव्य स्पर्धा पार पडत आहे. तर आशिया कप 2022 बद्दलची संपूर्ण माहिती पाहूया...
T20 फॉर्मेटमध्ये होणार सामने
आशिया कप 2022 स्पर्धेचे सामने टी20 फॉर्मेटमध्ये खेळवले जाणार आहेत. यंदा सामन्यांचा विचार करता आधी ग्रुप स्टेमधील सामने आणि त्यानंतर राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. तर आता आशिया कपचा पहिला सामना 27 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा होणार आहे. यावेळी ग्रुप स्टेजचे सामने 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत खेळवले जातील. यामध्ये भारत आपला एक सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध तर दुसरा 31 ऑगस्टला हाँगकाँगविरुद्ध खेळेल. दुसरीकडे ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ एकमेंकाविरुद्ध भिडतील. आता ग्रुप स्टेजमध्ये टॉप 2 वर असणारे प्रत्येकी दोन-दोन संघ सुपर 4 मध्ये जातील. ग्रुप स्टेजनंतर सुपर 4 मध्ये आलेले चारही संघ राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळतील. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहेत.
ग्रुप स्टेज सामन्यांचे वेळापत्रक
27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान
28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट - बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान
31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हॉंककाँग
कुठे होणार लाईव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग
आशिया कप 2022 मध्ये लाईव्ह ब्रॉडकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. त्यामुळे आशिया कप 2022 चं लाईव्ह ब्रॉडकास्ट स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेल्सवर विविध भाषांमध्ये पाहता येईल. याशिवाय लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार अॅपवर पाहू शकता. तसंच सर्व अपडेट्स एबीपी माझाच्या साईटवरही तुम्हाला मिळणार आहेत.
आशिया कपचा इतिहास
आशिया कपच्या इतिहासाचा विचार करता स्पर्धेची सुरुवात 1984 मध्ये झाली होती. आशिया कप 1984 साली टीम इंडियाने जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत 14 वेळा आशिया कप पार पडला आहे. यामध्ये भारताने 7 वेळा भारताने ट्रॉफी मिळवली आहे. तर श्रीलंकेचा संघ 5 वेळा जिंकला आहे.
हे देखील वाचा-