Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेतील सामन्यात भारतानं पाकिस्तानवर (IND vs PAK) पाच विकेट्सनं विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्याचा सेलिब्रेटींसोबतच विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आनंद लुटला. या सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आणि बीसीसीआयचे मुख्य सचिव जय शाह (Jay Shah) स्टेडियममध्ये उपस्थित होते. भारतानं सामना जिंकल्यानंतर जय शाहसोबत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं त्यांच्या दिशेनं भारताचा झेंडा पुढं केला. परंतु, त्यावेळी जय शाहनं भारताचा झेंडा हातात पकडण्यास नकार दिला, हे दृष्य कॅमेरात कैद झाली आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी जय शाहला ट्रोल केलं.
नेमकं काय घडलं?
या सामन्यादरम्यान भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयचे मुख्य सचिव जय शाह तेथे उपस्थित होते. भारतीय संघाच्या विजयानंतर जय शाह प्रत्येक भारतीय चाहत्यासारखेच आनंदी होते आणि टाळ्याही वाजवत होते. परंतु, त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं त्यांच्या दिशेने तिरंगा पुढं केला, मात्र, जय शहा यांनी तिरंगा हातात घेण्यास नकार दिला.
व्हिडिओ-
नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
जय शाहचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर एका युजर्सनं जय शाह यांना प्रश्न विचारला की, त्यांनी तिरंग्याचा असा अपमान का केला? कुणीतरी असंही लिहिलं होतं की, जय शाहनं आपल्या वडिलांना समजावून सांगावं की खरा भारतीय होण्यासाठी हातात तिरंगा धरण्याची किंवा थिएटरमध्ये राष्ट्रगीत गाण्याची गरज नाही.
कारण काय असू शकतं?
भारतानं पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. याच दरम्यान, जय शाहचा व्हिडिओ सोशल मीडियावर तिरंगा नाकारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. जय शाह यांनी हातात तिरंगा न घेण्यामागचं कारण काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, यसीसी सदस्य कोणत्याही विशिष्ट देशाच्या बाजूने असू शकत नाहीत, या कारणांमुळे जय शाह यांनी त्यावेळी तिरंगा हातात घेण्यास नकार दिला. मात्र, यामागचं कारण जय शहा यांच्या वतीनं अद्याप देण्यात आलेलं नाही. भारताचा तिरंगा हातात न घेण्यामाग नेमकं कारण काय? हे जय शाहचं अचूकपणे सांगू शकतील.
हे देखील वाचा-