Naseem Shah T20I Debut: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) भारत आणि पाकिस्तान यांच्यात (India vs Pakistan) आशिया चषकातील दुसरा टी-20 सामना खेळला जातोय. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतानं अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला (Avesh Khan) संघात जागा दिलीय. तर, युवा यष्टीरक्षक ऋषभ (Rishabh Pant) पंतला विश्रांती देण्यात आलीय. दुसरीकडं पाकिस्तानच्या संघानं युवा गोलंदाज नसीम शाहला (Naseem Shah) टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिलीय. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 96 वा खेळाडू आहे. 19 वर्षीय नसीमनं अलीकडंच नेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दमदार गोलंदाजी केली होती. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आलं होतं.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, "युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह आशिया चषक 2022 मध्ये भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे." पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिल्यानं नसीम शाहनं पीसीबीचे आभार मानले. सर्व फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना मला खूप आनंद होत आहे, असंही त्यानं एका व्हिडिओद्वारे म्हटले आहे.
ट्वीट-
नसीम शाहची प्रतिक्रिया
"मी एकदिवसीय मालिकेत चांगल प्रदर्शन करून दाखवलं. भारताविरुद्धचा हा मोठा सामना आहे. भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा माझा तिसरा फॉरमॅट आहे. मी देवाचा आभारी आहे की, मी तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानकडून खेळत आहे."
संघ-
भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
पाकिस्तान
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहानी.
हे देखील वाचा-