India vs Pakistan, Asia Cup 2022: आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला काहीच तास शिल्लक असताना भारताविरुद्ध पाकिस्तानचा संघ (Team Pakistan) हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार आहे. मुसळधार पावसामुळं पाकिस्तानमध्ये महापूर आलाय. ज्यामुळं नागिरकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधल्या पूरग्रस्तांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तानचा संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार आहे, असं कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) पत्रकार परिषदमध्ये म्हटलंय. 


पाकिस्तानमध्ये महापूर
मुसळधार पावसामुळं पाकिस्तानमध्ये आलेल्या महापूरमुळं नागरिकांवर अनेक संकटाचा सामना करावा लागतोय. या पूरात आतापर्यंत 1000 हून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. पाकिस्तानमधील 'डॉन' वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये महापुरामध्ये आतापर्यंत 1000 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 343 मुलांचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरुच आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, देशात 14 जूननंतर सिंध प्रांतामध्ये पुरामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तसेच कराची, पंजाब आणि बलूचिस्तानमध्येही परिस्थिती फारच वाईट आहे. पाकिस्तीनी मीडिया रिपोर्टनुसार, देशातील 70 टक्के भागाला पुराचा फटका बसला आहे. याचा सर्वाधिक परिणाम सिंध प्रांतावर झाला आहे. या महाप्रलयामुळं सुमारे तील कोटी लोकांचे संसार पाण्यात वाहून गेले असून लोक बेघर झाले आहेत. पूरामध्ये मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पूरग्रस्तांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध आज खेळण्यात येणाऱ्या टी-20 सामन्यात काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार आहे. 


बाबर आझम काय म्हणाला?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदमध्ये बाबर आझम म्हणाला की," पाकिस्तानचे नागरिक सध्या कठीण काळातून जात आहेत, त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आहोत. टीम म्हणून आम्ही नागरिकांची मदत करणार आहोत."


2021 टी-20 विश्वचषकात भारताचा दारूण पराभव
इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी खेळण्यात आलेल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानच्या संघानं भारताचा 10 विकेट्सनं पराभव केला होता. या सामन्यात पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं सलामीवीर रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना बाद घेऊन भारताच्या टॉप ऑर्डरला धक्का दिला होता. ज्यामुळं भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंतर भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानं तडाखेबाज फलंदाजी करत भारताचा 10 विकेट्सनं पराभव केला होता. विश्वचषकातील सामन्यात पहिल्यांदाच भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागलाय.


हे देखील वाचा-