First time Indian seamers have taken all ten wickets in an innings: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आशिया चषकातील (Asia Cup 2022) दुसरा टी-20 सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय योग्य ठरला आणि भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या संघाला 147 धावांवर गुंडाळलं. या कामगिरीसह भारताच्या वेगवान गोलंदाजानं (Indian Seamers) खास विक्रमाला गवसणी घातली. पाकिस्तानविरुद्ध भारतीय वेगवान गोलंदाजांनी सर्व 10 विकेट्स घेतली आहेत. भारतीय वेगवान गोलंदाजांनी पहिल्यांदाच अशी कामगिरी करून दाखवलीय. 


पाकिस्तानविरुद्ध टी-20 सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) तीन आणि अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh) दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, आवेश खानच्या (Avesh Khan) खात्यात एक विकेट्स जमा झाली. हे सर्व वेगवान गोलंदाज आहेत. यापूर्वी वेस्ट इंडीजविरुद्ध (West Indies) टी-20 सामन्यात भारताच्या फिरकीपटूंनी (Indian Spinners) सर्व 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. 


पाकिस्तानचा संघ 147 धावांवर ढेपाळला
नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघात 19.3 षटकात सर्वबाद 147 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं सर्वाधिक 43 धावा केल्या. ज्यात चार चौकार आणि एक षटकारांचा समावेश होता.  पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला भारतीय संघ कशी कामगिरी बजावतोय? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह. 
पाकिस्तान 


पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहानी. 


हे देखील वाचा-